HW News Marathi
महाराष्ट्र

रश्मी ठाकरेंचे वडिल माधवराव पाटणकरांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई | मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे आणि दैनिक ‘सामना’च्या संपादक रश्मीताई ठाकरे यांचे वडील, उद्योजक माधवराव पाटणकर यांचे आज (१५ जून) निधन झाले आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. रश्मीताईंना पितृवियोगाचे दुःख सहन करण्याचे बळ मिळो. पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठाकरे आणि पाटणकर कुटुंबियांच्या दुःखात सामील आहेत, असेही उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात दिला आहे.

माधव पाटणकर वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माधव पाटणकर यांनी मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालावली. माधव पाटणकर यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शोक व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे ट्वीट करत म्हटले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे आणि रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पाटणकर आणि ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुकाराम मुंढे नागपूर महापालिका आयुक्त तर अश्विनी भिडेंची मेट्रो – ३ प्रकल्पातून उचलबांगडी

swarit

तीन चाकी कुठे न्यायची हे चालक नाही, मागे बसलेली सवारी ठरवते !

News Desk

१० वी १२ वीचे प्रत्यक्ष वर्ग प्रायोगिक तत्वावर सुरू होणार

News Desk