HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आणि संभाजी भिडेंची बंद दारामागे झाली बैठक!

सांगली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल(२ ऑगस्ट) सांगली दौऱ्यावर होते. सांगलीत झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. उद्धव ठाकरेंनी सांगलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेतली. ठाकरे आणि भिडेंची ही बैठक १५ ते २० मिनिटे चालली होती.

बंद दरवाज्या मागील चर्चा अजूनही गुपित

उद्धव ठाकरे आणि संभाजी भिडे यांच्यात इतका वेळ बंद खोलीत काय चर्चा झाली हे अजूनही गुपित आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे भूसंपादन कार्यालयात तब्बल एक तास वाट पाहत होेेते. ही बैठक बंद दाराआड झाली. यामुळे भिडे आणि ठाकरे यांच्यात नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. माध्यमांनी भिडे यांना या बैठकीबाबत विचारले असता भिडेंनी त्यावर मौन बाळगलं आहे.

मला अशी थोतांड येत नाहीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर असताना तिथल्या नागरिकांशी संवाद त्यांनी साधला. संकटं आली की आपल्याकडे पॅकेज जाहीर केली जातात, ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. संकट आलं की पॅकेजची घोषणा होते, मग हे पॅकेज जातं तरी कुठं, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच मला अशी थोतांड येत नाहीत. मला खोटं बोलता येत नाही. जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं जाईल आणि ते केल्याशिवाय राहणार नाही, असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तुम्हाला तर घरातून काढले”, अकबरुद्दीन ओवेसींची राज ठाकरेंवर टीका

Aprna

“सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पुतळा स्थापित करण्याचा शासनाचा प्रयत्न!” – भुजबळ

News Desk

बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार! – मुख्यमंत्री

Aprna