HW News Marathi
देश / विदेश

आयकर रिटर्न भरण्याची तारिख पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बंद ठेवण्याची घोषणा केली. दरम्यान, आर्थिक वर्ष २०१८-१९ चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ही ३१ मार्च असून ती मुदत वाढवून द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. याशिवाय २३४ बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्म कर भरण्याची तसेच ३० एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी अशी विनंती केली आहे. फेब्रुवारी २०२०ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख २२ मार्च आहे, ती देखील वाढवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत आहे. शहरांतील सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही आहे. पुढील १५-२० दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच, मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने, आस्थापना व खासगी कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तसेच, सिनेसृष्ट्रीतील कलाकार, राजकीय नेते सगळेच कोरोनाचे संकट कसे दुर होईल यासाठी सर्वतोपरी मदत करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू

swarit

सालाबादप्रमाणे CBSE१० वीच्या निकालात मुलींनी मारली बाजी !

News Desk

Hyundai कंपनीच्या ‘त्या’ ट्वीटवरून वाद; कंपनीनं बिनशर्त माफी मागावी, शिवसेनेची मागणी

News Desk