HW News Marathi
महाराष्ट्र

“माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे!” मुख्यमंत्र्यांचे विठुरायाकडे साकडे

पंढरपूर | दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडतो आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा सपंन्न झाली तर यंदा मानाचे वारकरी म्हणून कोलते दाप्त्यांना मान मिळाला.

“पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे”, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले आहे.

यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. दरम्यान, टाळ मृदुंगात ग्यानबा तुकारामचा गजर… रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या शिवशाही बस अशा वातावरणात मानाच्या दहा पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. कोरोना संकटामुळे केवळ मानाच्या दहा पालख्यांनाच पंढरपूरला जाण्याची मुभा देण्यात आलीय. त्यासाठी प्रत्येक पालखीसोहळ्यासोबत ४० वारकऱ्यांना परवानगी होती त्याचबरोबर त्यांना कोरोना चाचणीची अट कायम ठेवण्यात आली होती.

हा परंपरेचा वृक्ष

आज (२० जुलै)  मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

पुढल्या वर्षी पासून तरी आम्हाला मुक दर्शन व्हावे अशी प्रार्थना

महापुजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे ते पुढे म्हणाले. सध्या कोरोनाच्या संकटात आपल्याला पंढरीच्या पायापर्यंत नाही पोहचता आलं तरी त्याचे आशिर्वाद कायम आपल्यासोबत असणार आहेत….पुढल्या वर्षी पासून तरी आम्हाला मुक दर्शन व्हावे अशी प्रार्थना आपण या विठुरायाकडे करूयात.

यंदा मानाचे वारकरी म्हणून कोलते दाप्त्यांना मान मिळाला. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली. केशव कोलते हे वर्धा येथील रहिवासी असून १९७२ पासून महिन्याची वारी करीत असत. गेल्या २० वर्षापासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन रांगेतील भविकातून मानाचा वारकरी निवडता ये नसल्याने मंदिरात सेवा देणाऱ्या भविकातून ही निवड केली जाते. आपण केलेली सेवा फळाला आली आणि विठुरायाचे पूजा करण्याचे भाग्य मिळाले अशी भावना कोलते यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊननंतर सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी खुले

News Desk

महापालिका आयुक्तांनी या कारणासाठी मागितली महापौरांची माफी

News Desk

आढळराव पाटलांना शिरूर मतदारसंघ सोडावा लागणार?

Manasi Devkar