HW News Marathi
महाराष्ट्र

सरनाईकांचे अनधिकृत बांधकाम, 21 कोटींचा दंड वसूल करा, सोमय्यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

ठाणे। महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या मालमत्तेची पाहणी करणाऱ्या, किरीट सोमय्या यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांप्रकरणी त्यांच्याकडून 21 कोटी रुपये वसूल करावे, अशी मागणी केली. किरीट सोमय्या यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची भेट घेतली. विहंग गार्डन इमारतमधील लोकांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. तसेच सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत पालिकेने त्यांच्याकडून 21 कोटी रुपयांचा दंड वसूल करावा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

आता प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार

सरनाईक यांच्याकडून अद्यापही हा दंड वसूल झाला नाही. ठाकरे सरकार सरनाईक यांच्याकडून 21 कोटी दंड का वसूल करत नाही? सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी करणार? असा सवाल त्यांनी केला. या कारवाईबाबत राज्य सरकारशी चर्चा करून लवकरच पावलं उचलणार असल्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडला गेला. आता अनिल परब यांचे ऑफिस तुटणार आणि प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामवर कारवाई होणार यासाठी मी ठाणे महापालिका आयुक्त यांना भेटायला आलो आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांना निवडले आहे, असं ते म्हणाले.

किरीट सोमय्या यांची पुण्यात उद्या पत्रकार परिषद

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल शिवसेना खासदार भावना गवळी यांची बाजू घेतली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार हे भावना गवळींची बाजू घेत आहेत. मात्र, भावना गवळींच्या बाबत उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मी सर्व खुलासा करेल, असं त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पूरग्रस्तांना पॅकेज म्हणजे वृत्तपत्रातील प्रसिद्धीची बातमी’, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

News Desk

येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या जागेची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

Aprna

“…म्हणून राऊतांना जेवण पचत नाही”, फडणवीसांचा राऊतांवर निशाणा

News Desk