HW News Marathi
महाराष्ट्र

वैभव पिचड यांची कार्यकर्त्यांसोबतची बैठक संपताच “जय श्री राम”च्या घोषणा

मुंबई | आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसला एकामागून एक जोरदार धक्के बसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अकोले मतदारसंघाचे आमदार वैभव पिचड हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दूरध्वनीद्वारे मुलाखत दिल्याचे सांगितले जात असताना वैभव पिचड यांनी शुक्रवारी (२६ जुलै) मात्र आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. इतकेच नव्हे तर ही बैठक संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी “जय श्री राम”च्या घोषणा दिल्या आहेत.

वैभव पिचड यांच्या अकोले मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देखील सुपूर्द केले आहेत. त्यामुळे, आता वैभव पिचड यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. वैभव पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष मधुकर पिचड यांचे पुत्र आहेत. राष्ट्रवादीसाठी हा अत्यंत मोठा धक्का आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार वैभव पिचड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आता वैभव पिचड यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ या देखील येत्या ३० जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर अण्णा हजारे कृषी कायद्यांविरोधात मोदींविरुद्ध आंदोलन करणार

News Desk

‘तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा’, मुख्यमंत्र्यांचा तळीयेतील नागरिकांना आधार….!

News Desk

सोलापूरमधील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

News Desk