HW News Marathi
मुंबई

मुंबईत आढळले स्वाईन फ्लूचे ७ रुग्ण

मुंबई । गेल्या १५ दिवसांत स्वाईन फ्लूचे ७ रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. मुंबईत स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. यानंतर सर्वसामान्यांनी घाबरून न जाता ताप आला असता, तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असा सल्ला पालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
मुंबईमध्ये जानेवारी महिन्यात एकाही स्वाईन फ्लूच्या रुग्णाची नोंद झाली नव्हती.
खासगी रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून येत होते. अशा रुग्णांची माहिती खासगी डॉक्टरांनी पालिकेला देणे अपेक्षित आहे. त्यानुसार पालिका रुग्णालयांसह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्लूच्या सात रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दीड महिन्याच्या काळात तब्बल १० रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये स्वाईन फ्लूबाधित रुग्णांची संख्या ७ वर गेली आहे. यातील ४ रुग्ण हे ठाण्याचे रहिवासी उसून उर्वरित ३ उपचारांसाठी खोपोली आणि खारघर भागातून उपचारासाठी नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात दाखल झाले आहेत.
सर्व प्रभागातील संबंधित आरोग्य अधिकार्‍यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ताप, सर्दी वा श्‍वसनविकाराशी संबंधित कोणतीही त्रासदायक लक्षणे अंगावर काढू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पालिकेच्या सर्व प्रसूतिगृहांमध्ये स्वाईन फ्लूला प्रतिबंध करणार्‍या लसी उपलब्ध आहेत
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या विसर्जन रथावर वादग्रस्त फलक

News Desk

विधि व न्याय विभाग उच्च न्यायालयात माहिती तंत्रज्ञानासंबंधी दोन पदांच्या निर्मितीस मान्यता

News Desk

रिलायन्स कंपनीची निवड कुणी केली, हे ड सॉल्ट एव्हीएशनलाच माहिती !

Gauri Tilekar