HW News Marathi
मुंबई

‘अंधेरीच्या राजा’चे आज विसर्जन

मुंबई | ११ दिवसांच्या बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन वाजत गाजत झाले. पण आज नवसाला पावणारा आणि दरवर्षी संकष्टी चतुर्थीला विसर्जन होणारा गणपती अशी ख्याती असलेल्या ‘अंधेरीच्या राजा’ची आज विसर्जन मिरवणूक आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरु होणारी ही मिरवणूक शनिवारी पहाटेपर्यंत सुरु राहील. उपनगरांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अंधेरीच्या राजासाठी यावेळी रांजणगावातील महागणपती मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे.

अंधेरीचा राजा गणेश मंडळाकडून १९६७ पासून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. या मंडळासाठी दरवर्षी भक्तांकडून मूर्ती दिली जाते. यासाठी २०५६ या वर्षांपर्यंत भक्तांची प्रतिक्षायादी आहे. देशातील प्रसिद्ध मंदिरांचे देखावे साकार करणाऱ्या आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीनने यंदा ८.५ फूटांची अंधेरीच्या राजाची मूर्ती यंदा अष्टविनायकापैकी प्रसिद्ध असलेल्या थेऊरच्या गणपती मंदिरात विसावली आहे. आज संध्याकाळी ६ वाजता आझाद नगर २ येथील गणेश मंडपातून अंधेरीच्या राजाच्या भव्यदिव्य अशी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस.व्ही.रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सातबंगला, गंगाभवन मार्गे वेसावे समुदकिनारी येत्या शनिवारी दुपारी पोहचेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीने राजकारण तापले; 3 महिन्यांपासून स्थानिकांची पाण्यासाठी वणवण

Chetan Kirdat

Dahi Handi | दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू

News Desk

शेतकऱ्यांची ‘थप्पड की गुंज’ सामनातून सरकारवर टीका

News Desk
देश / विदेश

तृप्ती देसाई लवकरच सबरीमाला मंदिरात प्रवेश करणार

News Desk

मुंबई | केरळमधील सबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निकाल दिला. महिलांना मंदिरात प्रवेशबंदी करणे घटनाबाह्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने सबरीमला मंदिरात महिलांनाही पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करणाऱ्या निर्णयाचं स्वागत केले असून हा राज्यघटनेचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच सबरीमाला मंदिरात प्रवेश करणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी जाहीर केले मात्र तारीख सांगितलेली नाही.

Related posts

उत्तरप्रदेशामध्ये बॉम्ब स्फोट

News Desk

संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात, पण अनेकजण आदळआपट करतायत !

News Desk

आज येणार आरुषी-हेमराज हत्याकांडाचा निकाल

News Desk