HW News Marathi
मुंबई

सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांना ‘ऑफिसर ऑफ दी मंथ पुरस्कार’

मुंबई | मुंबई महानगरपालिकेकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. महानगरपालकेेकडून जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार आणि अधिकारी संदीप कदम, दुय्यम अभियंता परिरक्षण व सुमंत जाधव / दुय्यम अभियंता (घ. क. व्य) यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

जी उत्तर विभागामध्ये दादर माहीम परिसराचा समावेश आहे. यावर्षी ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनासाठी करण्यात आलेले नियोजन चोख होते. सर्वच स्तरातून याचे कौतुक देखील करण्यात आले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामाची दखल थेट महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतली. “हा सन्मान संपूर्ण जी उत्तर विभागतील अधिकारी व कर्मचारी यांचा आहे. तसेच जी उत्तर विभागातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे”, असे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी यावेळी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दारू बंदीच्या विषयावरून विधानसभेत गदारोळ

News Desk

लोकलमध्ये मंगळसूत्र चोरून ट्रॅकवर उडी मारणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

News Desk

राज्य सरकारच्या कारभारावर जनतेचा भरोसा राहीला नाही

News Desk