HW News Marathi
मुंबई

ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर हैराण

मुंबई । ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच उन्हाटा तडाका वाढल्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. राज्याचे कमाल तापमानात कमालीची वाढ झाल्यी नोंद झाली आहे. शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश अशी नोंद झाली. मुंबईचे तापमान शनिवारच्या तुलनेत रविवारी २ अंश तापमानात घट नोंदविण्यात आली असली तरी देखील मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. तसेच रविवारी दुुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहराचे कमाल तापमान ३७ अंश नोंदविण्यात आले.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे असल्याची नोंद झाली आहे. कोकणसह गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर कोकण आणि गोव्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

संपुर्ण राज्यात १५ ते १६ ऑक्टोबर दरम्यान हवामान कोरडे राहणार असून १७ ते १८ ऑक्टोबरला कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मुंबईत सोमवार आणि मंगळवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २४ अंशाच्या जवळपास असणार असून आकाश निरभ्र राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिच्या गुप्तांगात खुपसली लाठी म्हणून तिचा मृत्यू

News Desk

पनवेल महापालिकेच्या आशिर्वादाने रहिवाशी त्रस्त

News Desk

ओएनजीसीचे हेलिकॉप्टर कोसळले

News Desk