मुंबई | अंधेरी रेल्वे स्टेशन जवळील गोखले पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या घटनेत एकूण ५ जण जखमी झाले आहेत. पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याबाबत दमणच्या नागरिकाने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना सावध केले होते.
Respected @PiyushGoyal ji @indianrailway__ the ROB beneath is in dilapidated condition at andheri platform no 8, for information n action pl pic.twitter.com/51ZMClwOre
— Vishal Tandel (@VTDaman) September 5, 2017
अंधेरीच्या फलाट क्रमांक ८ आणि ९ वरील पादचारी पुलाची अवस्था बिकट असून या मोडकळीस आलेल्या पुलाबाबत कारवाई करावी असा संदेश देणारे ट्विट विशाल तांडेल या दमण नागरिकांनी केले होते. तांडेल यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर हॅडलवर ट्विट करुन रेल्वे मंत्र्यांना सावध केले होते. ‘दमण’च्या नागरिकाने रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि भारत सरकार यांना ५ सप्टेंबर २०१७ रोजी ट्विटरवर पाठवला होता. त्याबरोबर पुलाची वाईट स्थिती दर्शविणारे फोटोही पाठवले होते. परंतु त्याची दखल घेतली नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.