मुंबई | दादर रेल्वे स्थानकात एका महिलेची प्रसूती झाल्याची नुकतीच घटना घडली आहे. या महिलेला रेल्वे स्थानकावरच प्रसूतीकळा सुरु झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संबंधित महिलेची सुखरूप प्रसूती झाली. हा संपूर्ण प्रकार दादर रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Mumbai: Geeta Deepak Wagare, a 21-year-old gave birth to a baby
on the platform of Dadar Railway station on December 24. Geeta was waiting for a train to Pune with her husband. Both the mother and the baby were later admitted to hospital for further treatment.— ANI (@ANI) December 26, 2018
दादर रेल्वे स्थानकावर २४ डिसेंबर रोजी पहाटे १.५० वाजता गीता दिपक सतय्या (वाघरे), वय-२१ वर्षे, राहणारी जेजुरी या त्यांच्या पती व दोन लहान मुलांसह त्यांना पुणे येथे जाण्यासाठी आल्या होत्या. फलाट क्रमांक ४ वर कँटीनजवळ गाडीची वाट पाहत बसल्या होत्या. यावेळी अचानक गीता यांना प्रसूतीवेदना होऊ लागल्या. हे पाहताच तिथे उपस्थित असलेल्या लोहमार्ग दलातील महिला पोलिसांनी गीता यांना त्वरित आश्रय देवून चादरीचा आडोसा केला.
त्यासोबतच १०८ क्रमांकावर संपर्क करून डॉक्टरांना पाचारण केले. यानंतर तिथेच गीता यांची प्रसूती झाली.त्यानंतर त्यांना व नवजात बालकाला तात्काळ सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सदर महिला व तिचे बाळ सुखरूप आहे. जीआरपीएफ महिला व पुरुष पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपणारी कामगिरी केल्याने गीता व तिच्या पतीने सर्वांचे मानले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.