HW News Marathi
मुंबई

पालकमंत्र्यांनी केले मिसाल मुंबईचे कौतुक

ठाणे | ठाण्याच्या इंदिरानगरची झोपडपट्टी सध्या लोकांना आकर्षित करताना दिसून येत आहे. या झोपडपट्टीला रंगरंगोटी केल्यामुळे तीचे रुप पालटले आहे. झोपटपट्टीचे बदललेले रुप पाहून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेही भारावून गेले.

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह शिंदेंनीही हातात ब्रश घेवून चक्क भिंती रंगविण्यास सुरूवात केली. आकर्षित करणा-या या भिंती पाहून या उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी भरभरुन कौतुक केले. दरम्यान खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनीही या उपक्रमास भेट देवून या अनोख्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

ठाणे महानगरपालिका आणि मिसाल मुंबई या स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून इंदिरानगर झोपडपट्टीमधील झोपड्यांना विविध रंगात रंगविण्याचे काम सुरू आहे.फक्त दोन दिवसात त्या झोपड्यांना वेगळे रूप प्राप्त झाले आहे. पूर्वीचे डोळ्यांना चकवा देणारे झोपडपट्टीचे रूप आणि डोळ्यांना सुखावणारे चित्र पाहून निश्चितपणे झोपडपट्ट्चे रूप पालटल्याचे जाणवते.

या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंदिरानगर झोपडपट्टीस भेट दिली. त्यांनी इंदिरानगरचे पालटलेले रूप पाहून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि मिसाल मुंबई या संस्थेच्या प्रमुख रूबल नागी यांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी त्यांनी केवळ रंगरंगोटीच नाही तर इथल्या नागरिकांमध्ये आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, परिसर साफसफाई याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईत जोरदार पाऊस, रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

महापालिकेविरोधात त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा !

News Desk

सायन स्टेशनजवळ एलबीएस मार्गावर आग, जिवीतहानी नाही

News Desk
महाराष्ट्र

भीमा कोरेगाव प्रकरणी एकबोटेंना जामीन मंजूर

News Desk

पुणे | भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटे यांना विषेश न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २५ हजार रुपयांच्या जातमुचक्यावर एकबोटेंना जामीन मंजूर झाला आहे. भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार घडवल्याच्या आरोपात एकबोटेंना अचक झाली होती.

मिलिंद एकबोटेंना यापूर्वी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. त्या दिवशीच एकबोटेंना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती.

१ जानेवारीला रोजी कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त वंदन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी जमले होते. त्यावेळी कोरेगाव भीमा गावच्या हद्दीतील वढु रोड, डीग्रहजवाडी रोड, पुणे-नगर महामार्ग या ठिकाणी उसळलेल्या दंगलीमध्ये दगडफेक, जाळपोळीच्या घटना झाल्या.

या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी एकबोटे यांना कलम ३०७ सह १२० (ब) सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा कलम ३ व ४, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम ७ अशा विविध कलमानुसार अटक करण्यात आली होती.

 

 

Related posts

“ओ परबांनू, आयकतास ना! मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका”, नितेश राणेंनी डिवचले

News Desk

सिंगापूरमधील आरोग्य परिषदेत सहभागी होणार! – राजेश टोपे

News Desk

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा; सरकारकडून २२९७ कोटी वितरित  करण्याचा आदेश काढला

News Desk