HW News Marathi
मुंबई

के.ई.एम. रुग्णालयात हृदयविकार पुनर्जीवन प्रात्‍याक्षिक संपन्‍न

मुंबई | पालिका कर्मचार्यांकरिता के.ई.एम. रुग्‍णालय व ‘इंडियन सोसायटी ऑफ ऍनेस्‍थेसिओलॉजिस्‍ट’ च्‍या संयुक्‍त विद्यमाने नुकताच अतिरिक्‍त पालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) आय.ए.कुंदन यांच्‍या प्रमुख उपस्थि‍तीत (हृदयविकार झटका-पुनर्जीवन) या विषयावर प्रात्‍यक्षिक व वैद्यकीय माहितीचे एक दिवसीय उपक्रम पार पडला.

एखाद्या व्‍यक्तिचे हृदय जर बंद पडले तर, त्‍याच्‍या शरीराची हालचाल पूर्णपणे बंद पडते अश्‍या परिस्थितीत लोकांना आधी काय करायचे याच प्रशिक्षण ५२५ पालिका कर्मचाऱ्यांना देण्‍यात आले. यामध्‍ये बंद पडलेल्‍या हृदयावर आपत्‍कालीन सुविधा आणि उपचार उपलब्‍ध होईपर्यंत त्‍याच्‍या छातीवर दोन्‍ही हातांनी दाब (पंपिंग) करणे किती गरजेचे आहे आणि ते कशापध्‍दतीने केले पाहिजे याची माहिती इंडियन सोसायटी ऑफ ऍनेस्‍थेसिओलॉजिस्‍टच्‍या अध्‍यक्ष डॉ. दिपा काणे यांनी दिली.

तसेच संबंधित व्‍यक्‍ति‍ला किमान ५ ते ६ सेंटिमीटर खोल आणि प्रत्‍येक मिनिटाला १२० वेळा पंपिंग करणे गरजेचे असते याचे प्रशिक्षण डॉ. काणे यांनी व त्‍यांच्‍या टिमने पालिका कर्मचाऱ्यांना दिले. आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध होईपर्यंत पंपिग करायचे आहे. हे सर्वांना कळले तर हृदयामुळे येणारे मृत्‍यु कमी करता येऊ शकतात.ज्‍यातून त्‍या व्‍यक्तिचा जीव वाचविता येऊ शकतो. त्‍यामुळे हे प्रशिक्षण सर्वांना देणे खूप जास्‍त गरजेचे आहे आणि त्‍यातून जनजागृती होणेही महत्‍वाचे असल्‍याचे अतिरिक्‍त आयुक्‍तांनी यावेळी सांगितली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

  विश्वजीत कदम, उद्योजक अविनाथ भोसलेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा

News Desk

पती पत्नीसह नऊ जणांना अटक, घरगुती वादात केली कारवाई

News Desk

…अन् खेळता खेळता जीव गेला

News Desk
मुंबई

मनपा शाळेच्या मैदानावरील अतिक्रमण हटविले

swarit

मुंबई | अंधेरी पश्चिम परिसरात पालिकेची ‘डी. एन. नगर मनपा शाळा’ आहे. या शाळेच्या ३० हजार चौरस फुटांच्या खेळाच्या मैदानावर ८ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम उद्भवले होते. तसेच सदर प्रकरण न्यायप्रविष्ट होते. या अनुषंगाने उच्च न्यायालयाने नुकताच पालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सदर अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. परिमंडळ ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यता आलेल्या या कारवाईमुळे आता सदर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे अधिक मोठे मैदान उपलब्ध होणार आहे. तसेच या मैदानावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये. यासाठी मैदानाच्या सीमेवर लवकरच संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती ‘के पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागांतर्गत जुहू, जोगेश्वरी (प.), अंधेरी (प.), विलेपार्ले (प.), जुहू समुद्रकिनारा, ओशीवरा, वर्सोवा व वर्सोवा समुद्र किनारा इत्यादी परिसरांचा समावेश होतो. या ‘के पश्चिम’ विभागात डी. एन. नगर पोलीस स्टेशनच्या मागे पालिकेची ‘डी. एन. नगर’ मनपा शाळा आहे. या शाळेलगत शाळेचेच सुमारे ३० हजार चौरस फुटांचे खेळाचे मैदानही आहे. या मैदानाच्या सुमारे ८ हजार चौरस फुटांच्या भागावर अनधिकृत बांधकाम केले होते. याबाबत उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांत करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान सदर अनधिकृत बांधकाम तोडण्यात येऊन खेळाचे मैदान मोकळे करण्यात आले आहे. मुंबई पोलीस दलाच्या विशेष सहकार्याने करण्यात आलेल्या या कारवाई करिता ४२ पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात होता. तसेच या कारवाईत पालिकेचे ३० कामगार, कर्मचारी, अधिकारी देखील सहभागी झाले होते. या कारवाईसाठी २ जेसीबी, २ ‘लॉरी’ यासह हातोडे, घण व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली आहे, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

Related posts

अॅड. उज्ज्वल निकम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

News Desk

शासकीय योजनेतून एका व्यक्तीला एकच घर, लवकरच मुख्यमंत्री घेणार निर्णय

News Desk

अर्शद वारसीच्या त्या तक्रारीची अदानी इलेक्ट्रिकसिटीने घेतली दखल

News Desk