HW News Marathi
मुंबई

मराठा आंदोलकांची उद्या मुंबई बंदची हाक

मुंबई | मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या (२५ जुलै रोजी) मुंबईसह उपनगरात मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगडमध्ये बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी घोषणा केली आहे.

दादरमधील राजर्षी शाहू सभागृहात आज मराठा क्रांती मोर्चाची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार किंवा हिंसा होणार नाही, असे आश्वासन पवार यांनी दिले आहे.औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभुमीवर आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

बैठकीतील महत्वाचे मुद्दे –

  • उद्या मुंबईसह उपनगरात बंदची हाक
  • कोणताही अनुचित प्रकार, हिंसा होणार नाही. तोडफोड न करण्याचे आवाहन समन्वयक वीरेंद्र पवार यांनी केले आहे.
  • दहावी व बारावीची फेर परीक्षाबरोबर शाळा व महाविद्यालयांना बंदमधून वगळण्यात आले आहे.
  • मेगाभरती तत्काळ थांबवी आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागून राजीनामा द्यावा.
  • खासगी वाहने मात्र रस्त्यावर फिरू देणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे.
  • मराठा क्रांती मोर्चा आज महाराष्ट्र बंदची हाक दिली केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामनाथ मोतें, शेषराव बीजवार यांची शिक्षक परिषदेतून हकालपट्टी

News Desk

Raksha Bandhan Special | राष्ट्राभिमानी समितीचे अनोखे रक्षाबंधन…

News Desk

आता पश्चिम रेल्वेच्या महिला डब्ब्यावर दिसणाऱ्या ‘स्त्री’चा लोगो बदलला

News Desk