HW News Marathi
मुंबई

पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर

मुंबई| मुंबई आयआयटीच्या ५६ व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित रहाणार आहेत. यावेळी मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला पंतप्रधानांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर देखील उपस्थित राहणार आहेत.

 

सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोमेश टी वाधवानी यांना आयआयटीकडून डी लिट पदवी प्रदान केली जाईल. तसेच दीक्षांत समारंभानंतर पर्यावरण विज्ञान अभियांत्रिकी केंद्र, ऊर्जा विज्ञान अभियांत्रिकी विभागाच्या नव्या इमारतींचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उत्सवाच्या काळात ‘परे’ची कारवाई

News Desk

नालासोपारा बॉम्ब प्रकरणी एटीएसने १२ जणांना ताब्यात घेतले

News Desk

मुंबईकरांसाठी नवीन वर्सोवा-बांद्रे सी-लिंक

News Desk
राजकारण

भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, आमदार आहुजा वादाच्या भौव-यात

News Desk

नवी दिल्ली | भाजपातील वाचाळवीर नेते सर्वांनाच सुपरीचित आहेत. अनेकदा चुकीच्या वक्तव्यामुळे भाजपाच्या या वाचाळवीरांनी पक्ष अध्यक्ष अमित शहा यांच्यासह नरेंद्र मोदींना देखील अनेकदा अडचणीत आणले आहे. पुन्हा एकदा भआजपाचे आमदार ज्ञानदेव आहूजा यांनी विवादास्पद वक्तव्य केले आहे. जवाहरलाल नेहरु हे गोमांस खात होते, ते पंडित कसे होऊ शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

राजस्थानच्या रामगढचे भाजप आमदार ज्ञानदेव आहूजा म्हणाले, ”जवाहरलाल नेहरू पंडित नव्हते. ते गाई व वराहचे मांस खात होते. वराह मुसलमानांसाठी अपवित्र तर, गाई आमच्यासाठी पवित्र आहे. जो प्राण्यांना खातो तो कधीच पंडित होऊ शकत नाही. परंतु त्यांच्या मागे ब्राम्हण जोडले गेले.

आमदार ज्ञानदेव आहूजा यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. जवाहर नेहरु विद्यापीठात (जेएनयु) विद्यार्थी किती बिअर पितात, मटन किती खातात, कंडोम किती वापरतात याची आकडेवारी त्यांनी दिली होती. या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती.

Related posts

अशोक चव्हाण यांचा दावा खोटा, विधानसभा बरखास्त होणार नाही !

News Desk

मनसेने भाजपला सोडवायला दिली ५६ मार्कांची प्रश्नपत्रिका

News Desk

मुंबईतील डांबरी रस्त्यांची आवश्यकता असेल तर चौकशी करु उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna