HW News Marathi
मुंबई

मेस्मा कायद्यावरून शिवसेना पुन्हा आक्रमक पाचव्यांदा सभागृह तहकूब

मुंबई | मेस्मा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवेसनेने विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. यामुळे तब्बल पाच वेळा विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, कामकाज सुरू होताच पुन्हा शिवसेना सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली.

अध्यक्षांनी शिवेसनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत इतर विषयांवरील चर्चेला सुरुवात केली. शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायदा रद्द करण्याची मागणी केली. भारतीय कामकार कांउन्सिलने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामगारांचा दर्जा दिलेला आहे.

त्यामुळे त्यांना मेस्मा कायदा लागु करू नये, असी शिवसेनेची भूमिका असल्याचे प्रभू यांनी सांगितले. यादरम्यान, गोंधळ वाढल्याने अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिर्केने उभारली अनधिकृत इमारत म्हाडाने अदा केले 19 कोटी

News Desk

तीन वर्षांत राज्यात शालेय शिक्षणाची घसरण

News Desk

डॉ. आंबेडकर स्मारकाचा खर्च १६६ कोटींनी वाढला

News Desk
महाराष्ट्र

राज ठाकरेंच ‘ते’ व्यंगचित्र खरं ठरल, महाराष्ट्रात दहशदवाद्यांचा तळ बनतोय

News Desk

पुणे | काही दिवसापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्यंगचित्र काढले होते. या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी जी भिती दर्शवली होती. तिच भिती अखेर खरी ठरली आहे. पुण्यातील एका लष्करी बांधकामाच्या साईटवरून एटीएसने पुणे मॉड्यूलचा भाग असणाऱ्या राज मंडळ ह्या ३१ वर्षाच्या तरुणाला अटक केली असून तो या लष्करी साईटवर पर्यवेक्षक म्हणून कामाला होता.

एटीएसने तपासणी केल्यानंतर कळाले की, हा गेल्या २ वर्षापासून पुण्यात स्थायी असल्याची माहिती एटीएसने दिली आहे. तर चार साथीदारांची नावे सांगितली असून यांचा शोध एटीएस करत आहेत.

बांगलादेशातील अनसरुल्लाह बांगला ‘एटीबी’ ही दहशतवादी संघटनेचा संबंध‘अल कायदा’ या संघटनेशी असल्याचे कळाले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा सहित सर्व राज्यातील एटीएस पथकाच्या मदतीने भारतात ‘एटीबी’ या दहशवादी संघटनेची पाळेमुळे कितपत पसरली आहेत याचा शोध घेणार आहेत.

एटीएसने केलेल्या उलट तपासणीत त्याने अनेक साथीदार जोडले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याने उलट तपासणीत त्याच्या आणखी चार साथीदारांची नावे उघड केली आहेत. हा बांगलादेशी तरुण गेली २ वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता आणि तो ‘एटीबी’ च्या संबंधित अतिरेक्यांना सर्व प्रकारची मदत पुरवत होता.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं होत. त्यामध्ये मोदी सरकारला हाच धोक्याचा इशारा देऊन सतर्क करण्याचा प्रयत्नं केला होता. त्या व्यंगचित्रात त्यांनी आधी खरा धोका कुठला आहे हे दाखवले होते ज्यामध्ये बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरच भारताचा खरा धोका आहेत हे मोदीसरकारला पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सरकार देशातील मुस्लिमांशी संबंधित नको त्या विषयात अधिक गुंतले होते आणि मूळ धोका काय आहे त्याकडेच दुर्लक्ष झालं होत.

https://www.facebook.com/RajThackeray/photos/a.231227950741695.1073741829.165370377327453/289939131537243/?type=3

Related posts

महाराष्ट्राच्या महिला बालकल्याण विभागातल्या महाघोटाळ्याची स्मृती इराणींना भेटून चौकशी करण्याची केली मागणी!

News Desk

‘दोन शिवसैनिकांची भेट’, भेटीनंतर अमोल कोल्हे म्हणाले…..

Jui Jadhav

मी जगात फक्त एकाच माणसाला घाबरतो | तुकाराम मुंढे

Adil