HW News Marathi
मुंबई

रेल्वे अंगावरून जाऊनही जिवंत | सीसीटिव्हीत कैद

मुंबई | आत्महत्येच्या हेतूने लोकल रेल्वे ट्रॅकवर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती वाचू शकेल, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र देव तारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

गेल्या 31 जानेवारीला विक्रोळी रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला. विक्रोली रेल्वे स्टेशन वर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने दिनकर सपकाळ (वय 65 वर्षे) यांनी स्वतःला चालत्या लोकल खाली झोकून दिले. परंतु देव तारी त्याला कोण मारी या उक्ति प्रमाणे दोन रुळांच्या मध्ये असलेल्या खडीच्या खड्ड्यात अडकल्यामुळे संपूर्ण रेल्वे त्यांच्या अंगावरुन जाऊन सुद्धा त्यांना साधे खरचटले पण नाही. ही सर्व घटना प्लॅटफॉर्म वरील सी सी टीवी मध्ये कैद झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनुपम खेर एफटीआयच्या प्रमुखपदी

News Desk

पतंग उत्सवात नायलॉन मांजावर १० फेब्रुवारीपर्यंत बंदी

Aprna

लोकसभेत आठवलेंना विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्धार

swarit