HW News Marathi
मुंबई

हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे जल्लोषात स्वागत

मुंबई | चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन संवत्सर साडेतीन मुहूर्तांपैकी एक हिंदूंचा नववर्ष म्हणजेच “गुढी पाडवा”. देशभरातील हिंदू हा सण उत्साहात साजरा करतात त्यात महाराष्ट्रातील हिंदू बांधव हा घराबाहेर गुढी उभारून आपल्या नववर्षाचे स्वागत जल्लोषात करतो. मुंबईच्या वेगवेगळ्या विभागात विविध पारंपरिक पोषक घालून पुरुष आणि महिला वर्ग शोभा यात्रा काढतात त्यात गिरगांव,कुर्ला,दादर मध्ये भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले जाते.

मुंबईचा केंद्रबिंदू दादर म्हणजे अस्सल मराठमोळी वस्ती असणारा भाग. 17 वर्षांपूर्वी रा स्व संघाचे दिवंगत गजानन फडके उर्फ अण्णा यांनी समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणण्यासाठी सुरु केलेल्या “हिंदू नववर्ष यात्रेने” आता विशाल रूप घेतले असून दादर -माहीम-प्रभादेवी मधील लहान – थोर आपल्या नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटण्यासाठी रस्त्यारस्त्यावर भव्य रांगोळ्या, हिंदू धर्माचे दर्शन घडवणारे चित्ररथ, ढोलताश्यांचा गजर, वारकरी टाळचिपळ्यांच्या साथीने ईश्वराचे नामस्मरण करत ह्या यात्रेत सहभागी झाले होते.

दादरमधली नववर्षस्वागतयात्रेची मुख्य गुढी दादर सेनाभवन समोर उभारली जाते सकाळी 8 वाजता तिचे गुढीपूजन केले जाते. यंदा आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या संस्थापिका प्रसिद्ध उद्योगिनी मीनलताई मोहाडीकर, सारस्वत बँकेचे संचालक किशोर रांगणेकर यांच्यासोबत जिम्नॅस्टिक्समध्ये राष्ट्रीय स्तरावर कामगिरी बजावणार्‍या दोन दादरकन्याही गुढीपूजनाला उपस्थित राहून मंत्रोपचाराच्या साथीने गुढीचे पूजन केले. दरवर्षी माहीम ते प्रभादेवी या पट्टयातील निवडक मान्यवरांच्या हस्ते होणारे गुढीपूजन हेच दादर येथील स्वागतयात्रेचे वैशिष्ट्य आहेत. दरवेळी नवीन मान्यवरांना हा मान दिला जातो.

या व्यतिरिक्त यंदाचे मुख्य आकर्षण म्हणजे 50 ठिकाणी होणारे गुढीपूजन. या गुढींच्या सजावटीची स्पर्धा घेतली गेली व त्यातील विजेत्यांना बक्षिस दिले जाणार आहे, वेगवेगळे चित्र रथांनी या स्वागतयात्रेची शोभा वाढविली. लहान मुलांनी सजलेला देवलोक हा चित्ररथ यंदाचे आकर्षण ठरला. ह्या यात्रेचे आयोजन रमेश देवळे,भूषण मरदे, राजेंद्र फडके आणि अन्य कार्यकर्त्यांनी मिळून केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे कार्यकर्त्यांकडून गुजराती पाट्यांची तोडफोड

News Desk

परकीयांना भारतीय मिरचीची भूरळ

News Desk

BMC Election 2022: 53 ओबीसींसाठी आरक्षित वॉर्ड कोणते?, शिवसेनेच्या दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित

Manasi Devkar