HW News Marathi
देश / विदेश

मोटारमनशिवाय १३ किलोमीटर धावली रेल्वे

नवी दिल्ली: रेल्वे विभागाचा गलथान कारभार दिवसेंदिवस चव्हाट्यावर येत आहे. गुरुवारी सकाळी स्टेशनपासून १३ किलोमीटर दूर अंतरावर धावली. दुस-या इंजिनच्या सहाय्याने एका मोटारमनने मोठे धाडस दाखवून ही रेल्वे थांबली. यामुळे अनेकांचे प्राण वाचले व मोठा अनर्थ टळला. कर्नाटक राज्यातील कुलबर्गी येथे ही घटना घडली. दरम्यान, दुसरीकडे मुंबईत मध्य रेल्वेचा गर्दीच्या वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुण्याकडे रवाना झालेल्या प्रगती एक्स्प्रेसचं इंजिन ठाणे आणि मुलुंडदरम्यान बंद पडल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने मुंबईकर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.घराकडे निघालेल्या प्रवाशांची कोंडी होऊ नये म्हणून जलद मार्गावरील सर्व गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. मात्र ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने मुंबईतील स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पॉर्न वेड्या नवऱ्याविरोधात पत्नीची सुप्रीम कोर्टात तक्रार

News Desk

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश

Aprna

मोदी सरकार विमाने खरेदी करू शकतात मात्र शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत –  प्रियंका गांधी

News Desk
मुंबई

मोनोरेलच्या आगीवर नियंत्रण

News Desk

मुंबई म्हैसूर कॉलनी मोनोेरेल स्टेशनजवळ मोनोरेलच्या शेवटच्या दोन डब्यांना आग लागली. या दुर्घटनेत मोनोचे दोन्ही डबे जळून खाक झाले आहेत. या घटनेते कोणतीही जीवितहानी झालेली नाही.आज पहाटे स्टेशनवर मोनोरेल उभी असताना अचानक आग लागली. आग लागल्यामुळे मोनोरेलची वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यामुळे ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गुरुवारी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला तातडीनं याची माहिती देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलानं आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Related posts

भाजपकडून जाहिरातबाजीवर 500 कोटींचा खर्च – नवाब मलिक

News Desk

संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी

Chetan Kirdat

चीनी चोरट्यांनी मुंबईतून चोरला ३४ लाखांचा हिरा

News Desk