नवी दिल्ली | दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या तातडीची बैठक घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल गृहमंत्रालयात दाखल झाले आहेत. तिन्ही दलाच्या प्रमुखांसह अजित डोवाल यांची तातडीची बैठक बोलावण्यात अली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावली आहे. भारताच्या हवाई हद्दीमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान शिरल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
National Security Advisor Ajit Doval arrives at the Home Ministry in Delhi. pic.twitter.com/LeB5gKOw7I
— ANI (@ANI) February 27, 2019
नौशेरा सेक्ट्रमधील राजौरी येथे पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केली आहे. पाकिस्तानकडून हवाई हद्दीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत शिरून पुंछ, राजौरी भागात बॉम्ब टाकल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्रालयाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
Pakistan Air Force's F-16 that violated Indian air space shot down in Indian retaliatory fire 3KM within Pakistan territory in Lam valley, Nowshera sector. pic.twitter.com/8emKMVpWKi
— ANI (@ANI) February 27, 2019
भारतीय वायू दलाने पाकिस्तानी वायू दलाचे एफ-१६ हे विमान पाडल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वृत्त लवकरच…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.