बेंगळुरू। भारतात बेकायदेशीररीत्या सुरु केलेले बिटकॉइन एटीएमवर सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे.आणि ते एटीएम सील करण्यात आले आहे. युनोकॉईन या कंपनीने हे एटीएम बेंगळुरूतील ओल्ड एअरपोर्ट रोडवरील केम्स फोर्ट मॉलमध्ये हे एटीएम नुकतेच सुरु केले होते.भारतात बिटकॉइनच्या व्यवहारावर बंदी असून ही हे एटीएम सुरु करण्यात आले होते. बिटकॉइनच्या खरेदी आणि विक्रीसाठी हे एटीएम सुरु करण्यात आले होते. एटीएम सुरु करणाऱ्या हरीश बीव्ही (वय ३७) यांना अटक करण्यात आले आहे. हरीश बीव्ही हे युनोकॉईन टेक्नॉलॉजीसचे सहसंस्थापक आहेत.
Bengaluru: Cyber Crime Police seized 2 laptops,1 mobile, 3 credit cards, 5 debit cards, 1 cryptocurrency device and 1.79 lakhs cash from UNOCOIN cryptocurrency company yesterday. UNOCOIN had opened an ATM Kiosk in Old Airport Road at The Kemp Fort Mall. One arrested. #Karnataka
— ANI (@ANI) October 24, 2018
या कारवाईदरम्यान सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी २ लॅपटॉप, १ मोबाइल, ३ क्रेडिट कार्ड्स, ५ डेबिट कार्ड्स, १ क्रिप्टोकरन्सी डिवाइस, पासपोर्ट आणि १ लाख ७९ हजार रुपये रक्कम हस्तगत केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.