मुंबई । देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात घट होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना थोडा दिलासा मिळत आहे. आज (मंगळवार) सलग १३ व्या दिवशी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली आहे. मुंबईत आज पेट्रोलची प्रतिलिटर किंमत ८५.०४ , तर डिझेलची प्रतिलिटर किंमत ७७.३२ रुपये एवढी झाली आहे. पेट्रोल प्रतिलिटर २० पैसे, तर डिझेल प्रतिलिटर ८ पैशांनी स्वस्त झाले आहे.
राजधानी दिल्लीत देखील पेट्रोलच्या किंमतीत २० पैसे तर डिझेलच्या किंमतीत ७ पैशांनी घट झाली आहे. त्यामुळे आज दिल्लीमध्ये पेट्रोलची प्रतिलिटर किंमत ७९.५५ रुपये, तर डिझेलची प्रतिलिटर किंमत ७३.७८ एवढी झाली आहे.
Petrol & diesel prices in #Delhi today are Rs 79.55 per litre (decrease by Rs 0.20) & Rs 73.78 per litre (decrease by Rs 0.07),respectively. Petrol & diesel prices in #Mumbai today are Rs 85.04 per litre(decrease by Rs 0.20) &Rs 77.32 per litre (decrease by Rs 0.08), respectively pic.twitter.com/YPLiifxBMg
— ANI (@ANI) October 30, 2018
मात्र काहीच दिवसांआधी देशात दर दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारातील रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणारी वाढ याचा परिणाम देशांतर्गत पेट्रोल, डिझेलच्या किंमतींवर होत असल्याचे त्यावेळी सरकारकडून सांगण्यात येत होते.
मध्यंतरीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने इंधनाच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा देखील केली होती. मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच असल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.