HW News Marathi
देश / विदेश

फ्रेंडशीप डे का ? साजरा केला जातो

इंग्रजी कॅलेंडरनुसार ऑगस्ट महिना आणि भारतीय दिनदर्शिकेनुसार श्रावण महिना आहे. ऑगस्ट महिना हा तसा भारतीयांसाठी खूप खास आहे. या महिन्यात सण-उत्सव असतात. भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस किंवा मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला जातो. खास करून तरुणवर्गासाठी “फ्रेंडशीप डे” खूपच खास असतो. यावेळ प्रत्येक मित्र-मैत्रिणींना फोन, मसेज, फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू देतात. मित्र-मैत्रिणी एकमेकांना रंगीत धागे बांधतात ‘फ्रेंडशीप डे’ साजरा केला जातो. फ्रेंडशीप डे चा तसा वेगवेगळा असा इतिहास आहे. परंतु त्यातील एक प्रसिद्ध इतिहास आहे.

फ्रेंडशीप डे चा इतिहास

फ्रेंडशिप डेची सुरूवात १९३५ मध्ये अमेरिकेतून झाली. ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिका सरकारने एका निर्दोष व्यक्तीला मारले होते. त्याच्या हत्येचे सर्वात जास्त दुःख त्याच्या मित्राला झाले होते. मित्राच्या विरहात त्याने आत्महत्या केली. २१ वर्ष लोक हा प्रस्ताव घेऊन लढत होते. अखेर१९५८ मध्ये अमेरिका सरकारने नागरिकांच्या प्रस्तावला मान्यता दिली आणि ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात आला.

प्रत्येक देशात वेगवेगळ्या फ्रेंडशीप डे दिवशी साजरा केला जातो

• पेरु- जुलै महिन्याचा पहिला शनिवार

• पेरुग्वे- ३० जुलै

• ब्राझील- २० जुलै

• भारत- ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझा ठरलंय…मी आता वेगवान बॉलिंग, गुगली आणि बॅटिंगही करणार ! फडणवीसांचा सूचक इशारा

News Desk

मी अंधभक्त नाही आणि अंधविरोधकही नाही – कन्हैय्या कुमार

News Desk

UP Election 2022 Live Updates : उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात ११ वाजेपर्यंत २०.०३ टक्के मतदान

Aprna