HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानचे कर्ज फेडण्यासाठी इम्रान खान यांनी केला म्हशींचा लिलाव

इस्लामाबाद | पाकिस्तानमध्ये नुकतेच इम्रान खान यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला आहे. देशात आर्थिक संकट असल्यामुळे खानने त्यांच्या ताफ्यातील ७० लग्जरी कारचा लिलाव केला आहे. या लग्जरी कारसोबत सात म्हशींचाही लिलाव करण्यात आला पंतप्रधान नवाज शरीफ यांनी माजी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी ८ म्हशी पाळल्या होत्या. परंतु खान यांनी सरकारने या आठही म्हशींच्या लिलाव केला आहे.

पहिल्या टप्यात ७० लग्जरी कार, ४ मर्सिडीज बेंझच्या कार, ८ बुलेटप्रूफ बीएमडबल्यू, ३ पाच हजार सीसीच्या एसयूव्ही कार, २ ते ३ हजार सीसी एसयूव्ही कार अशी २४ मर्सिडीज बेंझ कार्सचा लिलाव आतापर्यंत झाला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ४० टोयोटा कार आणि लेक्सस एसयूव्ही आणि दोन लँड क्रूझरचा लिलाव होणार आहे.

पाकिस्तानवर ३० अब्ज रुपये कर्ज असून हे कर्ज वाढत राहणार आहे. सध्या परिस्थिती पाकची अवस्था अत्यंत वाईट आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी खान सरकारने खर्च कपातीच्या विविध योजना जाहीर केल्या होत्या. या निधी उभारण्यासाठी सरकारी मालमत्तेचा वापर करण्यावर भर होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींनी लग्न करावे आणि ‘हम दो हमारे दो’ याची अंमलबजावणी करावी, आठवलेंनी दिला सल्ला  

News Desk

शशिकला यांच्याविरोधात माझ्याकडे सबळ पुरावे- डी. रुपा

News Desk

फडणवीस निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत | नवाब मालिकांचा आरोप

News Desk