HW Marathi
देश / विदेश

जैविक इंधनावर भारताचे पहिले विमान उड्डाण यशस्वी

नवी दिल्ली  | भारतात आज प्रथमच जैविक इंधनावर विमान उड्डाण करण्यात आले आहे. स्पाईस जेटच्या बम्बार्डियर Q400 या विमानावर करण्यात आलेला हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. जेट्रोफोच्या बियांपासून मिळणाऱ्या तेलाचा वापर इंधन म्हणून करण्यात आला आहे. विमानात जैविक इंधनाचा वापर करणारा भारत हा पहिलाच विकसनशील देश ठरला आहे.

या आधी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशांनी विमानात जैविक इंधनाचा वापर केला होता. या विमानात ७५ टक्के उत्सर्जन टरबाइन इंधन तर २५ टक्के जैविक इंधनाचा वापर करण्यात आला आहे. भारतात जैविक इंधनाला परवानगी मिळाली तर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होईल. हे उड्डाण जवळपास २५ मिनिटांचे होते. या परीक्षणावेळी डीजीएस आणि स्पाइस जेटच्या अधिकाऱ्यांसह आणखी २० अधिकाऱ्यांचा समावेश होता. या उड्डाणावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी, सुरेश प्रभू हे उपस्थित होते.

Related posts

#CoronaVirus : आज मध्यरात्रीपासून २१ दिवसांसाठी संपूर्ण भारत लॉकडाऊन, पंतप्रधानांची घोषणा

अपर्णा गोतपागर

कडू आणि कोसम्बींना साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

News Desk

पंतप्रधान मोदी आणि नथुराम गोडसे यांची विचारसरणी एकसारखीच !

अपर्णा गोतपागर