HW News Marathi
देश / विदेश

जाणून घ्या…लढाऊ विमान मिराज-२०००ची काही खास वैशिष्ट्ये

मुंबई | पुलावामा हल्ल्यानंतर भारताकडून मंगळवारी (२६ फेब्रुवारी) भारतीय वायु सेनेकडून पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांना उध्वस्त करण्यात आले आहे. जवळपास १ हजार किलो बॉंम्बचा या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर मारा करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ३२५ पेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहे. आतापर्यंत नेमके किती आतंगवादी मारले गेले याचा ठराविक आकडा आलेला नाही.

वायुसेनाकडून या हल्यासाठी आपल्या ताफ्यातील फायटर जेट मिराज-२००० चा वापर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण ऑपरेशनसाठी एकूण १२ मिराज जेट फायटर प्लेनचा वापर करण्यात आला आहे. हे मिराज-२००० त्याच कंपनीने बनविलेले आहे. ज्या कंपनीने राफेल विमान तयार केले आहे. महत्वाच म्हणजे हे तेच मिराज एयर क्राफ्ट आहे. ज्याचा वापर भारतीय सेनेने कारगिल युद्धाच्या वेळी केला होता.

भारतीय वायू सेनेचे लढाऊ विमान मिराज-२०००

  • अतिशय घातक लढाऊपैकी एक मानले जाणारे हे मिराज-२००० आहे.
  • या एयरक्रफ्टला १९८५ मध्ये भारतीय वायू सेनेत दाखल करण्यात आले होते.
  • वायुसेनेने याला वज्र हे नाव असून भारताकडून १९८२ साली ३६ सिंगल-सीटर मिराज-२००० आणि ४ ट्वीन-सीटर मिराज-२००० खरेदी करण्यात आले होते.
  • १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात मिराज-२००० ने अत्यंत महत्वाची भूमिका निभावली होती आणि भारतीय सैन्याने विजयश्री प्राप्त केली होती.
  • भारत सरकारने २००४ मध्ये अजून १० मिराज-२००० ऑर्डर केले. यानंतर भारताच्या ताफ्यात एकूण ५० फायटर जेट विमान आहेत.
  • २०११ मध्ये सरकारने आता वापरात असलेल्या मिराज-२००० ला अपग्रेड करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट साइन केला. यानंतर आता हे जेट विमान २०३० पर्यंत वापरण्यासाठी सज्ज आहेत.

लढाऊ विमान मिराज-२००० ची माहिती

  • मिराज-२००० या जेटमध्ये शैफ्ट इंजिनचा वापर केला जातो. हे अतिशय हलके आणि इतर फायटर विमानांच्या इंजिनसारखेच आहे.
  • १९७० साली या इंजिनाची पहिल्यांदा टेस्टिंग करण्यात आली होती.
  • हे फायटर जेट सिंगल फायटर वैमानिकासाठी सोइस्कर आहे. मात्र आवशक्यता पडल्यास दोन वैमानिक सुदधा यामध्ये बसू शकतात.
  • मिराज-२००० चा जास्तीत जास्त वेग २३३६ किमी प्रतिघंटा आहे. एकावेळी टाकी फुल केल्यास हे जेट १५५० किमी पर्यंतचा प्रवास करू शकते.
  • मिराज-२००० लेजर गाइडेड बॉंम्ब, एयर टू एयर आणि एयर टू सरफेस कॅरी करू शकते.
  • हे देश करतात मिराज-२००० चा वापर

भारताबरोबरच अजून ८ देशांच्या ताफ्यात मिराज-२००० हे फायटर जेट आहे. ज्यामध्ये फ्रांस, इजिप्त, युएई, पीरु, तायवान, ग्रीस, ब्राजील या देशांचा समावेश आहे. यामधील ब्राजीलने मिराज-२००० ला रिटायर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इस्रोचा नवीन इतिहास – अंतराळात भारताचे १०० उपग्रह

News Desk

“मविआ सरकारने एक उमेदवार मागे घ्यावा, मग घोडेबाजाराचा प्रश्नच उरत नाही,” फडणवीसांची प्रतिक्रिया

Aprna

चंदा कोचर यांच्याविरोधात सीबीआयचे लूकआऊट नोटीस जारी

News Desk