HW News Marathi
देश / विदेश

“कोरोना काळात नर्स डॉक्टरच्या रुपात देव आला होता”, लोकसभेत मोदींचे वक्तव्य

मुंबई | देशात कोरोना महामारीने लोकांना वेठीस धरले होते. २०२० हे वर्ष म्हणजे सगळ्यांसाठीच खडतर काळ होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१० फेब्रुवारी) लोकसभेत बोलताना भाष्य केले आहे. कोरोना काळात आपण स्वत:बरोबरच जगालाही सावरले. हा भारतासाठी टर्निंग पॉईंंट आहे. राष्ट्रपतींच्या भाषणातील प्रत्येक शब्द प्रेरणादायी होता. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाचा दरवाजा आपण वाजवत आहोत. हा मोठा क्षण आहे. महिला खासदारांनी मोठ्या संख्येने चर्चेत सहभाग घेतला, त्याचे आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेतील चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी कोरोनावरही भाष्य केले. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांवर मोदी बोलताना विरोधकांनी मोठा गदारोळ केला होता.

कोरोना प्रकोपात जग हलले, परंतू आम्ही वाचलो. देवाच्या कृपेने आम्ही वाचलो असे मनीष तिवारी म्हणाले होते. मी म्हणतो डॉक्टर, नर्सच्या रुपात देव आला होता. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी मृत्यूशी खेळत होते. मुलांना घरी ठेवून येत होते. त्यांच्या रुपात देव पावला, असे मोदी यांनी सांगितले. परदेशांमध्ये लाखो-करोडो डॉलर तिजोरीत पडून होते. त्यांना त्यांचे नागरिक वाचविता आले नाहीत. पण आपण आत्मनिर्भर झालो, असे मोदी म्हणाले. आधारविरोधात अनेक जण न्यायालयात गेले होते. मी आज यावर बोलणार आहे. आधारमुळे आज कोरोनाकाळात आम्ही जनधन, शेतकरी, पदपथवाले अशा अनेकांच्या खात्यात मदत पोहोचवली. आज आपल्याकडे विक्रमी जीएसटी जमा झाला आहे. ट्रॅक्टर, गाड्यांचा विक्रमी सेल झाला आहे. तीन कृषी कायदे आणले, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पेगॅससचे खरे बाप देशातच, केंद्राच्या संमतीशिवाय असा सायबर हल्ला होऊ शकत नाही!

News Desk

CDS बिपीन रावत यांना वेलिंग्टन सैनिक रुग्णालयाबाहेर लष्करी अधिकाऱ्यांकडून मानवंदना

News Desk

काश्मिरी अतिरेक्यांना मिळतो दुबई, इंग्लंडमधूनही पैसा

News Desk