HW News Marathi
देश / विदेश

पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची गरज | लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरची सध्याची परिस्थिती पाहता दहशतवाद्यांविरूद्ध पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची करण्याची गरज असल्याचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी सांगितले. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करण्याबद्दल बिपीन रावत म्हणाले की, पुन्हा एकदा हे पाऊल उचलण्याची गरज आहे. परंतु ते कधी व कसे याबद्दल आम्ही जाहीररित्‍या काहीही सांगू शकत नाही. पाकिस्तानकडून कायमच शस्त्रसंधीचे होत असते. २०१६ मध्ये उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्‍ल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्‍नान घातले होते.

२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानसह संपूर्ण जगाला भारताच्या क्षमतेची चांगलीच जाणीव झाली. मात्र त्यानंतरही पाकिस्तानच्या कुरघोडी थांबलेल्या नाहीत. पाकिस्तानकडून शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन केले जाऊ नये अशी अपेक्षा आहे. म्हणूनच दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आणि काश्मीर खोऱ्यात शांतता राखण्यासाठी भारतीय लष्कराकडून महत्‍वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याचे बिपीन रावत यांनी सांगितले.

काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तानमध्ये शांततेसाठी चर्चा करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पात्र लिहिले होते. मात्र भारतकडून ही चर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यावेळी पाकिस्तानसोबतची ही चर्चा रद्द करण्याच्या घेतलेल्या भारत सरकारच्या निर्णयाला लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी समर्थन दिले होते. संवाद आणि दहशतवाद एकत्रित राहू शकत नाहीत, असे बिपीन रावत म्हणाले होते. पाकिस्तानच्या पोस्ट विभागने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी बुरहान वाणी आणि तीन पोलिसांची क्रूर हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांची टपाल तिकिटे काढली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आयआयटी जेईई परीक्षेत महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला

News Desk

घोटाळेबाज सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर जेलचे पाहुणे होणारच ! सोमय्यांचा इशारा

News Desk

अन् खडसे फडणवीसांना म्हणाले, “आता जेवल्याशिवाय जाऊ नका…”

News Desk
व्हिडीओ

आपल्या कलेतून सामाजिक जाणिवा जपणारा एक अवलिया कलाकार

News Desk

एखादी कलाकृती सादर करताना त्या कलाकृतीसोबत त्यामागचा विचारही लोकांपर्यंत पोहोचवणे हे एका कलाकारासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या आगळ्यावेगळ्या कलेतून सामाजिक जाणिवा जपणारा एक असाच अवलिया कलाकार ‘चेतन राऊत’. २८ रंगछटांचा वापर करून पंचमुखी रुद्राक्षांपासून साकारलेले शिवाजी महाराजांचे मोझॅक हा चेतन राऊत यांचा ‘पाचवा विश्वविक्रम’

Related posts

आपण सरकारमध्ये असल्याचा ShivSena ला विसर! – Chandrakant Patil

News Desk

7 कोटी बनावट नोटा मुंबई पोलिसांकडून जप्त, 7 जणं पोलीस कोठडीत

News Desk

“ट्रॅफिकमुळे ३ टक्के घटस्फोट”; Amruta Fadnavis यांचं विधान

News Desk