HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : हवेत असो वा जमिनीवर, आम्ही तुम्हाला सोडणार नाही | भारतीय वायू दल

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायू दलाचे प्रमुख बी.एस. धनोवा यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “हवेत असो वा जमिनीवर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. कितीही प्रतिकूल परिस्थितीत शत्रूंशी दोन हात करण्यास भारतीय वायू दल पूर्णपणे सज्ज आहे”, असे स्पष्ट विधान धनोवा यांनी केले आहे.

राजस्थान रेतीने भरलेल्या जमिनीवर झालेल्या सर्वात मोठ्या युद्धाचा अभ्यास वायू शक्ती-२०१९ चा उल्लेख करत धनोवा यांनी असे म्हटले कि, “आम्ही हा अभ्यास केवळ दिखाव्यासाठी करत नाही. उलट आम्हाला शत्रूंना हे सांगायचे आहे कि हवेत असो वा जमिनीवर आम्ही तुम्हाला सोडणार नाही.

“देशाचे राजकीय नेतृत्त्व जी जबाबदारी आम्हाला सोपवले, ती जबाबदारी आम्ही अत्यंत उत्तमपणे निभावण्यासाठी वायू दल सज्ज आहे. आम्ही प्रत्येक मोहीम पूर्ण करण्यात अग्रेसर राहू”, असाही विश्वास यावेळी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नव्या घटनापीठाची स्थापना

News Desk

पथनाट्याच्या माध्यमातून जागतिक स्तनपान सप्ताह होतोय साजरा 

swarit

इस्राईलमध्ये हवाई हल्ल्यात अल-अक्सा टीव्हीची इमारत उध्वस्त

swarit