HW News Marathi
देश / विदेश

तृप्ती देसाई लवकरच शबरीमला मंदिरात प्रवेश करणार

मुंबई | एका बाजूला शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश दिला. त्यावरून देशभर आंदोलन सुरू आहेत. २८ सप्टेंबरला शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात १०-५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर अनेक शतकापासून असलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली असली तरी देखील न्यायालयाच्या या निर्णयाला अनेक स्तरावरुन तीव्र विरोध करण्यात येत आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आता अय्यप्पा मंदिराला भेट देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

तृप्ती देसाई एका मल्याळम वाहिनीशी संवाद साधतांना त्या म्हणाल्या, की लवकरच आम्ही शबरीमला येथील मंदिराला भेट देऊ. भेटीची तारीख लवकरच जाहीर करू. कोणीही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करू नये. कारण आता आम्हालाही मंदिरात प्रवेश करण्याचे समान हक्क असल्याचे त्या म्हणाल्या. केरळच्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पी. एस.श्रीधरन पिल्लई यांनी तृप्ती देसाई यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाविकांच्या श्रद्धेला देसाई यांनी आव्हान देऊ नये, असे ते म्हणाले. त्यांनी हजारो भक्तांच्या भावनांना भडकवण्याचे काम करू नये. अगोदरच न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाविकांना धक्का बसला असून त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर असल्याचे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदी रद्दबातल ठरवल्यानंतर केरळमध्ये न्यायालयाच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. कोल्लम तुलसी या ज्येष्ठ अभिनेत्याने न्यायालयाच्या या निर्णयावर अतिशय धक्कादायक विधान केले आहे. शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांचे दोन तुकडे करायला हवे असे मत त्यांनी मांडले आहे. तर नॅशनल अय्यप्पा डिव्होटिज असोसिएशनच्या वतीने न्यायालयाने या निर्णयावर फेरविचार करावा, अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. एकूणच केरळमधील वातावरण या निर्णयानंतर ढवळून निघत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“अधीर रंजनची अभी ज्यादा हो रहा है…” मोदी लोकसभेत भडकले

News Desk

गोल्फर ज्योति रंधावाला अटक

News Desk

चहा, नाष्टा देत नाही म्हणून पत्नीला तलाक

News Desk
देश / विदेश

सबरीमाला मंदिर निकाला संदर्भात आझाद मैदानात आंदोलन

News Desk

मुंबई | केरळ सरकारने आणि सुप्रीम कोर्टाने सबरीमाला मंदिर संदर्भात निकाला दिलेल्या निर्णयावरून भारतासह देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. मुंबईतील ठाणे, नवी मुंबईतील भगवान अयप्पा यांच्या भक्तांकडून आझाद मैदान येथे निषेध धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

सबरीमाला मंदिरात विराजमान असणारे अयप्पा ब्रह्मचारी असल्यानं मंदिरात १० ते ५० वर्षं वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर प्रशासनानं ही भूमिका घेतली होती. तसेच सबरीमाला मंदिराकडून महिलांबरोबर कोणताही भेदभाव केला जात नसून न्यायालयानं धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका मंदिर प्रशासनानं घेतली असल्याचे गोरेगाव अयप्पा मंदिराचे ट्रस्टी, नारायण पडीकर यांनी सांगितले आहे.

सबरीमाला मंदिराची ५०० वर्षापासून असलेली परंपरा तशीच पुढे ही सुरू राहावी. आणि न्यायालयानं धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये. सबरीमाला यात्रेच्या आधी ४१ दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग ४१ दिवस व्रत करू शकत नाहीत. त्यामुळेच १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. आज हजारोंच्या संख्येने दक्षिण भारतातील भक्त गण आझाद मैदान येथे एकत्रित आले आहे. केरल सरकार विरूध्द सुप्रीम कोर्टाच्या निकाला विरुद्ध तीव्र विरोध करण्यात येत आहे. असे श्रीराज नारायण यांनी सांगितले.

Related posts

राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार – निलेश राणे

News Desk

पंतप्रधान खूप दिलदार, गुजरातला १००० कोटी दिले महाराष्ट्राला १५०० कोटी देतील!

News Desk

राफेलची कागदपत्रे चोरी झालीच नाहीत | महाधिवक्ता

News Desk