मुंबई | देशात कोरोना रुग्णांची वेगाने वाढत आहे. तर लडाखच्या सीमेवर चीनने याठिकाणी युद्ध सराव करत भारताविरोधात आक्रमक रणनीती वापरत आहे. यामुळे भारती आणि चीन दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण सुरू आहे. तसेच दुसरीकडे पाकिस्तान देखील भारताच्या सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लघंन करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “आम्हाला शांतता आणि अहिंसा हवी आहे. आणि आम्हाला पाकिस्तान किंवा चीनची जमीन देखील नको” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
Pakistan is on one side of our country, China on the other side. We want peace & non-violence. We never tried to snatch the land of Bhutan or Bangladesh. We don't want the land of Pakistan or China either. The only thing we want is peace: Union Minister Nitin Gadkari pic.twitter.com/Mk0fqg224K
— ANI (@ANI) June 14, 2020
गुजरात जनसंवाद संमेलनात बोलताना गडकरी म्हणाले, “आपल्या देशाच्या एका बाजूला पाकिस्तान आहे. तर दुसऱ्या बाजूला चीन आहे. आम्हाला शांतता आणि अहिंसा हवी आहे. आम्ही कधीही भूतान किंवा बांग्लादेशाची जमीन बळगावण्याचा प्रयत्न केला नाही. आणि आम्हाला पाकिस्तान किंवा चीनची जमीन देखील नको, आम्हाल फक्त शांतता हवी आहे.”
The corona crisis will not last long. Our scientists & scientists in other countries are working day and night to develop the vaccine. I am confident that we will get the vaccine very soon: Union Minister Nitin Gadkari at 'Gujarat Jan Samvad' rally via video conference pic.twitter.com/NwGbSRLACB
— ANI (@ANI) June 14, 2020
“देशात कोरोनाचे संकट फार काळ टिकणार नाही. आपल्या देशातील वैज्ञानिक आणि जगातील शास्त्रज्ञ हे कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोरोनावर लवकरच लस शोधली जाईल,” असा विश्वास गडकरी यांनी कार्यक्रमात बोलतना व्यक्त केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.