HW News Marathi
देश / विदेश

आम्हाला भारतासोबत शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत | इम्रान खान

नवी दिल्ली | ‘आम्हाला भारतासोबत शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत. भारतासोबत सलोख्याचे संबंध राखल्यास त्याचा फायदा दोन्ही देशांना होईल. यामुळे शस्त्रास्त्र स्पर्धा कमी होण्यास मदत होईल आणि मानवी संसाधनांचा वापर विकासासाठी करता येईल,’ असेही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यावेळी म्हणाले आहेत. सध्या भारतात फक्त २०१९ च्या निवडणुकांचे वातावरण आहे. त्यामुळे भारतातील आगामी लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मी भारतापुढे पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे करेन, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानचाही उल्लेख केला आहे

इम्रान खान सत्तेत आल्यानंतर त्यांनी भारत आणि पाकिस्‍तानमधील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांवर शांततेसाठी चर्चा सुरु करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. न्यूयॉर्कमध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण बैठकीत सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांची भेट व्हावी यासाठी इम्रान खान प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसत होते. मात्र दरम्यानच्या काळात पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे, घुसखोरी आणि भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्यामुळे भारताने पाकिस्तान सोबतच्या या चर्चेला नकार दिला होता.

भारताने भेटीसाठी नकार दिल्यानंतर इम्रान खान यांनी ट्ववीटद्वारे ‘भारत गर्विष्ठ आहे’ असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. “मी दिलेल्या भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यानचा शांतेसाठीच्या प्रस्तावाला भारताकडून आलेल्या नकारात्मक प्रतिसादामुळे मी निराश झालो आहे. भारत गर्विष्ठ आहे. माझे संपूर्ण आयुष्य अशा लहान माणसांनी व्यापलेले आहे जे मोठ्या कार्यालयावर वर्चस्व स्थापन करतात पण त्यांना उद्याची मोठी स्वप्न पाहण्याची दृष्टी नाही,” या शब्दात खान यांनी संताप व्यक्त केला होता.

Related posts

अभिनेत्री रिया चक्रवर्ती अडचणीत ! NCB कडून एफआयआर दाखल

News Desk

अमेरिकेतील एच-४ व्हिसाधारकांना मोठा धक्का

swarit

#PulwamaAttack : काश्मिरी तरुणाचा वापर, सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाही हल्ला 

News Desk