HW News Marathi
Covid-19

विरोधी पक्षाने लोकांमध्ये कोरोनाबद्दल भीती निर्माण केली, योगी आदित्यनाथांचा आरोप

उत्तर प्रदेश| राज्यातील करोना परिस्थितीची जिल्ह्यांनुसार तपासणी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांना भेट देणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल मुजफ्फरनगरमध्ये होते. त्यांनी कोरोना नियंत्रण कक्षापासून आरोग्य विभागाने केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांची माहिती घेतली. योगी आदित्यनाथ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांवर कठोर शब्दात टीका केली.

विरोधी पक्ष लोकांना भडकवत आहेत असा आरोप करताना योगी यांनी, करोना संकटाच्या काळात लोकांना धीर देणं आणि त्यांची हिंमत वाढवण्याची गरज आहे त्यावेळेस विरोधी पक्षातील नेते लोकांना घाबरवण्याचं काम करतायत, असं म्हटलं आहे.

या साथीच्या रोगाच्या कालावधीमध्ये काही लोकांनी जनतेला धीर देऊन त्यांचा विश्वास वाढवण्याची गरज होती त्यावेळी त्यांनी जनतेला भडकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप योगींनी विरोधी पक्षांबद्दल बोलताना केला. विरोधी पक्षांनी भीती दाखवल्यामुळे लोक ऑक्सिजनसाठी धावपळ करु लागले आणि सर्वजण घाबरुन गेले, असा दावाही योगींनी केला.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलताना योगींनी, राज्य सरकारने तयारी सुरु केल्याची माहिती दिली. आम्ही आतापासूनच करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयारी सुरु केली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना प्रादुर्भाव होऊ शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. मात्र सर्वांनी या परिस्थितीमध्ये धीर धरणं गरजेचं आहे, असं योगी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनावर मात केलेल्या लोकांनी पुढे येऊन रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करा !

News Desk

रामदेव बाबा यांच्या पतंजलीचे औषध कोरोनावर किती प्रभावी ?, जाणून घ्या… डॉ. अविनाश भोंडवे काय म्हणतात

News Desk

ठाण्यात लॅाकडाऊन! अधिवेशनानंतर मुंबई,पुण्यात लॅाकडाऊन होणार?

News Desk