HW News Marathi
व्हिडीओ

आमचा अखंड पाठिंबा!; १२ निलंबित खासदारांच्या निदर्शन स्थळी दाखल झाले Sharad Pawar – Sanjay Raut

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. या १२ खासदारांवर संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ह्यात काँग्रेसचे सहा, टीएमसी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, तर सीपीएम आणि सीपीआयच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे. दरम्यान, याच १२ खासदारांनी आज संसदेतील महात्मा गांधी पुतळ्यासमोर निदर्शने केली ज्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला अखंड पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी शरद पवार यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. यावेळी या १२ खासदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे असल्याचं पवार म्हणाले.

#SharadPawar #SanjayRaut #SuspendedMP #ModiGovernment #NarendraModi #Congress #Shivsena #NCP #TMC

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?”; Bhagatsingh Koshyari यांच्या विधानाने राज्यात संताप

News Desk

‘आत्मक्लेश’च्या चर्चांवर कोल्हेंचा ‘पंजेफाड’

Manasi Devkar

भगव्याला विरोध करणाऱ्या घुबडांवर सरकारने कारवाई करावी! संजय राऊतांची विखारी टीका

News Desk