HW News Marathi
व्हिडीओ

BJP And NCP | आयारामांचं ओझ भाजपला पेलवणारं का ?

लोकसभा निवडणुकीत भाजपची लाट होती. सध्या भाजपप्रवेशाची लाट आहे. नेते उठसूठ भाजपमध्ये धावत आहेत. सोशल मीडियावर ह्या ‘मेगा भरती’ची खिल्ली उडवणे सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची हवा आहे हे कळत होते; पण इतक्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस रिकामी होईल असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही स्वप्नात नसेल. ज्यांचे सारे आयुष्य भाजपला रोखण्यात गेले ते आज भाजपचा कमळ मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत. चार महिन्यांत काँग्रेस आघाडीतले दोन डझन नेते भाजप-शिवसेना युतीमध्ये आले आहेत आणि काही वाटेवर आहेत. निवडणुकीला अजून दोन महिने आहेत. तरीही गळती थांबण्याचे नाव घेईना. आणखी काही आमदार येत असल्याचे खुद्द चंद्रकांतदादा पाटील म्हणाले आहेत. कशाकरिता हे लोक गर्दी करत आहेत? ह्या सर्वांना भाजप तिकीट देऊ शकणार आहे का?#BJP #NCP #SharadPawar #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MNS Flag | मनसेचा नवा झेंडा अडचणीत?

swarit

Abdul Sattar यांचा पहाटे पाच वाजल्यापासूनच मेळघाटात दौरा सुरू!

News Desk

पवार म्हणत असतील, ‘अरे या वयात मी इतका फिरतो आणि तू…’ ! चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंवर निशाणा

News Desk