मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, अवैध दारूविक्री व वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता या मुद्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने, राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी, चंद्रपुरमधील दारू बंदी संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते, हे दाखवणारा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. तर याच दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना त्यांच्या एका जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी, यवतमाळमधील दारूबंदीचं काय झालं? असं म्हणत चित्रा वाघ यांनी पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यामुळे राज्यात हा मुद्दा पेटला आहे
#DevendraFadnavis #JayantPatil #Chandrapur #SudhirMungantiwar #MVA #ThackerayGovernment #BJP #UddhavThackeray #ChitraWagh
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.