स्वबळाची घोषणा करणारे काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या रडार वर आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून अनेक राजकारण्यांनी आपलं मत मांडलं आहे. आता राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनीही भाष्य केलं आहे. ‘आम्ही काँग्रेस हायकमांडचे प्रतिनिधी असलेल्या एच. के. पाटील यांच्या बोलण्याला महत्त्व देतो. बाकीचे काय बोलतात त्याला महत्त्व नाही,’ अशा शब्दांत पटेल यांनी पटोलेंना टोला हाणला आहे.नाना पटोलेंच्या विधानांमुळे महाविकासआघाडी मधल्या कुरघोड्या लक्षात येतात. पटोले यांनी स्वबळाचा नारा देताना केलेल्या काही विधानांमुळं शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन याबद्दल चर्चा केली होती. त्यावेळी पवारांनी पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. आता पटेल यांनीही पटोले यांना टोला हाणला आहे. ‘ज्याला जे करायचं आहे ते करू द्या. आमची आघाडी आहे. पण कुठल्याही पक्षाला आम्ही बांधून ठेवलेलं नाही. ते काय करतात, त्यावर आम्ही उत्तरं का द्यायची,’ असा सवाल पटेल यांनी केला.
#NanaPatole #SharadPawar #PrafulPatel #ncp #congress #sharadpawar #mahavikasaghadi
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.