राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीनंतर महत्वाची असणारी पदवीधर आणि शिक्षक मतदार निवडणूक पार पडली. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक होती. यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा चुरशीचा सामना रंगला होता. यात उमेदवार होते…पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने यश मिळवला आहे… मात्र अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी जवळजवळ पराभव केला आहे… दरम्यान, यावरुन आता राजकीय वर्तळात विरोधकांकडून शिवसेनेला निशाणा करत टीका करण्यास सुरुवात झाली आहे…दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या या निवडणूकीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, भाजप या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी, प्रदेशाध्यक्षांनी अधिकृत उमेदवारांचा प्रचार केला होता…शिवसेनेचे अमरावती शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री उद् ठाकरे रिंगणात उतरणार असे म्हटले होते..मात्र, प्रत्यक्षात असे दिसून आले नाही….दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीकांत देशपांडे हे माझे मानसपुत्र आहेत तर त्यांना मत देत विजयी करा असे त्यांनी म्हटले होते..तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही सभा घेत श्रीकांत देशपांडे विजयी होण्यासाठी प्रचार केला होता…मात्र, मुख्यमंत्री यात कुठेच नव्हते हे दिसून आले…त्याचा शिवसेनेला फटका बसला का अशी चर्चा सध्या सुरू आहे.
#UddhavThackeray #SharadPawar #BalasahebThorat #NCP #Shivsena #Congress #Mahavikasaghadi #BJP
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.