HW News Marathi
व्हिडीओ

“अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा ईडी आणि सीबीआयने तपास करावा”,राऊतांची मागणी

जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयने अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास करावा असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. सीबीआय आणि ईडी पार्टीचे सदस्य आहेत का असा सवालही संजय राऊतांनी भाजपला विचारला आहे. सचिन वाझेंच्या पत्रातील आरोपांप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांचीदेखील सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली असून राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून आश्चर्य व्यक्त केलं आहे. ते मुंबईत आज (२५ जून) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयसाठी अयोध्येतील महापौर उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी रामजन्मभूमी न्यासासोबत केलेलं जमिनीचा व्यवहार अत्यंत योग्य प्रकरण आहे. तिथेसुद्धा या केंद्रीय यंत्रणांनी तपास करणं गरजेचं आहे. आणि फक्त महाराष्ट्राच्याच राजकारणीने कशाला तर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने अयोध्येत जो जमीन घोटाळा झाल्याचं स्पष्ट दिसत आहे त्याचा सीबीआय आणि ईडीने तपास करावा,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

#SanjayRaut #ED #AnilDeshmukh #NCP #CBI #ParambirSingh #ayodhya #bjp

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray यांनी ‘तुमची फाटते’ अशा शब्दात Uddhav Thackeray ना हीणवंल तर Narayan Rane ना ही शालजोडे!

News Desk

Udayanraje-AdityaThackeray-Sanjay Raut | उदयनराजे समर्थकांकडून सातारा बंद ,राऊत-आव्हाडांच्या निषेध

Arati More

“चप्पा चप्पा गुंज उठेगा इंकलाब के नारोंसे”; Nawab Malik यांच्या अटकेनंतर बहिणीची प्रतिक्रिया |

News Desk