HW News Marathi
व्हिडीओ

निलेश लंकेच्या कोव्हीड सेंटरमध्येच पार पडला लग्नसोहळा! कौतुकही अन् टीकाही..

अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात एक वेगळा विवाह सोहळा पार पडला.अनलॅाक प्रक्रियेत नगर जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत आणि त्यानंतर आता पारनेर तालुक्यातील दोन जोडप्यांनी चक्क कोविड सेंटरमध्येच लग्न केलं आहे. लग्नात होणारा अवांतर खर्च टाळून या जोडप्यांनी कोविड सेंटरला मदत केली आहे. अनेक हौशी जोडप्यांनी विविध ठिकाणी विविध प्रकारे लग्न केल्याचे आपण पाहिले आहे. पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेश लंके (NCP MLA Nilesh Lanke) यांच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर या कोविड सेंटरमध्येच दोन जोडप्यांनी लग्न केले आहे. दरम्यान, या अनोख्या लग्नसोहळ्यावर मात्र आता चांगल्या वाईट अशा दोन्ही पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहे. एकीकडे कौतुक होतंय तर दुसरीकडे टीका. नेमकं प्रकरण काय ? पाहूया

#NileshLanke #COVID19Centre #NCP #NCPMLA #SharadPawar #MVA #MahaVikasAghadi #AjitPawar #JayantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात महाविकासआघाडी सरकारमधील ‘हे’ नेते भाजपच्या रडारवर

News Desk

Chandrakant Patil Vs Sharad Pawar | पवारांना सांगा, स्वप्न पाहू नका.. सरकार आमचचं येणार !

Arati More

पवार म्हणत असतील, ‘अरे या वयात मी इतका फिरतो आणि तू…’ ! चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंवर निशाणा

News Desk