नवी दिल्ली । फैजाबादनंतर आता अहमदाबादच्या ही नावात बदल करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी हा निर्णय घेतला आहे. “कायदेशीर प्रक्रियांसाठी जनतेचे समर्थन मिळाल्यास अहमदाबादचे नाव बदलणार”, असे गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले आहे. प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. अहमदाबादचे नाव ‘कर्णावती’ असे ठेण्यात येणार आहे. ”कर्णावती नाव जनतेच्या पसंतीस आहे. अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात यावे ही लोकभावना आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळेस आम्ही अहमदाबादचे नाव बदलू”, असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
Since long, there's been demand to change name of Ahmedabad&rename it as Karnavati. If we get people's support for legal process, we're ready to change its name. People of Ahmedabad like the name Karnavati. Whenever time is appropriate we'll change it: Nitinbhai Patel,BJP (06.11) pic.twitter.com/mQtNvx7oE7
— ANI (@ANI) November 7, 2018
या निर्णयानंतर काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोशी यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. “मतांच्या राजकारण करायचे असल्याने भाजपकडून शहरांची नावे बदलली जात आहेत. अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात काहीही अर्थ नाही”,असेही दोशी म्हणालेत. हिंदूंची दिशाभूल करण्याचे काम भाजपाकडून होते आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण ‘अयोध्या’ असे केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.