HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

अमेठीतून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे २ मतदारसंघामधून उभे राहणार आहेत. उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि केरळमधील वायनाड मतदारसंघांमधून राहुल गांधी आगामी निवडणूक लढवतील. दरम्यान, याआधी वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आज (१० मार्च) उर्वरित अमेठी मतदारसंघातून देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करत भव्य रोड शो आयोजित केला होता. युपीए अध्यक्ष सोनिया गांधी, पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वॉड्रा देखील उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी गुरुवारी (४ एप्रिल) केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पारंपरिक मतदारसंघ अमेठीसोबतच केरळच्या वायनाडमधूनही लढण्याचा निर्णय घेतला आहे. अमेठीमधून भाजपच्या नेत्या स्मृती इराणीचे कडवे आवाहन राहुल गांधींना असणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात मैदानात उतरल्या होत्या. तेव्हा राहुल गांधींना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Related posts

भाजपच्या विजयानंतर मोदी-शहांनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट

News Desk

मोदी सरकार २.० : आजपासून पहिले अधिवेशन सुरू

News Desk

सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस घेणार राज्यपालांची भेट

News Desk