HW News Marathi
राजकारण

विधान परिषदमधील मतदान प्रक्रियेसाठी शिवसेनेची रंगीत तालीम

मुंबई | विधान परिषदे निवडणुकीवरून राज्यातील सर्व पक्षांनी त्यांच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले आहे. नुकतेच राज्यसभा निवडणूक पार पडली. यात महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला होता. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेकडून विधान परिषदेच्या मतदान प्रक्रियेसाठी शिवसेनेची रंगीत तालीम सुरू आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदाना वेळी होणाऱ्या चुका टाळण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी उद्या (20 जून)  मतदान होत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात ११ उमेदवार आहेत. या निवडणुकीत कोणाचा विजय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांयदे यांचे मत बाद झाले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना विधान परिषदेत पुन्हा कोणत्याही आमदारांचे मत बाद होऊ नये, म्हणून शिवसेनेकडून रंगीत तालीम सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने तीन मतावर आक्षेप घेतला होता. या तीन मतापैकी शिवसेने कांयदेचे मत बाद झाला होते. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मतांवर आक्षेप घेतले होते. परंतु, सुदैवाने दोन मते वाजली होतील. आता विधान परिषदेच्या दृष्टीने आमदारांना मतदान प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन सुरू आहे.

विधान परिषदेतील मतदान प्रक्रिया

विधान परिषदेत मतदान करताना आमदारांनी मतपत्रिकेत एक तरी अकडा लिहावा लागणार आहे. आणि एक अंकडा हा अंकात टाकला पाहिजे. एक हे शब्दात नको, एक हा अंकडा इंग्रजी, मराठी आणि रोमनमध्ये सुद्धा अंकडा टाकू शकतात. तसेच दुसरी पसंत दुसऱ्या अंकड्यासमोर आणि तिसरी पंसद तिसऱ्या अंकड्यासमोर, चौकटीच्या मध्य भागी आकडा टाकावा. मतपत्रिका टाकताना त्यासमोर मार्क करताना राईट नको, कारण तसे करणे देखील चुकीचे आहे. आमदारांना मतदान मतपत्रिकेसंदर्भातील सर्व मार्गदर्शन केले आहे.

संबंधित बातम्या
विधान परिषद निवडणुकीत खबरदारी म्हणून सर्व पक्षांचे आमदार पंचतारांकित हॉटेल मुक्कामी

Related posts

उदयनराजेंच्या भाजपप्रवेशानंतर आज प्रथमच शरद पवार साताऱ्यात

News Desk

प्रियांका चतुर्वेदी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…दिंडोरी मतदार संघाबाबत

News Desk