नवी दिल्ली | २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या पक्षाच्या राज्यातील कामकाजाच्या संरचनेत मोठा बदल केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी १७ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशाचे प्रभारी आणि सह-प्रभारी नियुक्त केले आहेत.
Bharatiya Janata Party appoints in-charge & co-incharge for 17 states and Chandigarh for 2019 Lok Sabha elections pic.twitter.com/qjrkZx58ct
— ANI (@ANI) December 26, 2018
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आंध्रप्रदेशमध्ये व्ही.मुरलीधरन आणि सुनील देवधर, आसाममध्ये महेंद्र सिंह, बिहारमध्ये भूपेंद्र यादव, छत्तीसगढमध्ये डॉ. अनिल जैन, गुजरातमध्ये ओ. पी. माथुर, हिमाचल प्रदेशमध्ये तीरत सिंह रावत, झारखंडमध्ये मंगल पांडे, मध्यप्रदेशमध्ये एक.व्ही.सिंह आणि सतीश उपाध्याय, मणिपूरमध्ये नालिन खोली, ओडिशामध्ये अरुण सिंह, पंजाब व चंदीगडमध्ये कॅप्टन अभिमन्यू यांची प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर राजस्थानमध्ये प्रकाश जावडेकर आणि सुधांशु त्रिवेदी, सिक्किममध्ये नितिन नविन, तेलंगणामध्ये अरविंद लिंबवाली, उत्तराखंडमध्ये थावरचंद गेहलोत यांची प्रभावी पदी निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये गोवर्धन झारपिया, दुष्यंत गौतम आणि नरोत्तम मिश्रा यांना प्रभारी व सह प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.