भोपाळ | मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील आश्वसनामुळे चांगलेच राजकारण तापलेले चित्र सध्या दिसत आहे. ” सत्ता आली तर शासकीय इमारती आणि परिसरात लावण्यात येणाऱ्या संघाच्या शाखांवर बंदी घालण्याचे”, आश्वासन काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात जनतेला दिले आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे भापजने संतप्त व्यक्त केली आहे.
RSS is a political org. If Congress party in MP in their manifesto has said it will put an end to this practice, I see nothing wrong with that. Governments servants as long as they are working in govt shouldn't openly associate with a political party: Congress's P Chidambaram pic.twitter.com/14RinugpsI
— ANI (@ANI) November 11, 2018
काँग्रेसने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी जाहीरनामा प्रसिद्ध केले आहे. यात हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने सौम्य हिंदुत्वाचा नारा देण्यात आला आहे. सत्तेत आल्यानंतर संघाच्या प्रभावाला आळा घालण्याचे वचन काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात दिले आहे. यात काँग्रेसने असे लिहिले आहे की, सरकारी कार्यालये आणि परिसरात आरएसएसच्या शाखा घेण्यावर बंदी घालण्यात येईल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना शाखेमध्ये भाग घेण्याच्या आदेशालाही रद्द करण्यात येईल. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी उलटवार करत म्हटले की, ‘मंदिर नही बनने देंगे, शाखा नही लगने देंगे हेच’, सध्या काँग्रेसचे धोरण आहे.
Looks like the Congress these days has only one motto- 'Mandir nahi ban ne denge, Shakha nahi chalne denge:' Sambit Patra,BJP on #Congress in its manifesto in #MadhyaPradesh says RSS 'shakhas' would not be allowed in Government buildings pic.twitter.com/ixMU7ZHUgn
— ANI (@ANI) November 11, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.