मुंबई | ईडी, सीबीआय आणि आयटी या तपास यंत्रणा देशाची लोकशाही मजबूत करतात. परंतु, या तपास यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्याबाहेरील शेपूट हलवणारे कुत्रे असतात, तशे त्या आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे उमेदवार भाई जगताप यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या खास मुलाखती भाजपवर केली आहे. येत्या 20 जून रोजी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर एच. डब्ल्यू. मराठीने भाई जगताप यांची खास मुलाखत घेतली आहे. यात भाईंनी विधान परिषद निवडणूक, केंद्रीय तपास यंत्रणेचा निवडणुकीत होणार वापर आणि अनेक मुद्यांवर एच. डब्ल्यू. मराठीशी संवाद साधला आहे.
निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला यावर भाई जगताप म्हणाले, “आरोप कश्याला तुम्ही दाखवत नाही ते सोडा. परंतु, या देशामध्ये ज्या ठिकाणी भाजपची सरकार आहे. तिथे ईडी कधी गेलेली किंवा भटकलेली दिसत नाही. ज्या ठिकाणी गैर भाजपचे सरकार आहे. त्या ठिकाणी त्याचा वापर हा दबावाखाली केला जातोय. हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे हे संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नामध्ये त्या मुलाला त्या वधूला मेहदीं काढणाऱ्या महिलेच्या घरी देखील ईडी जाते. यातून काय बाहेर येते किंवा यातून काय दिसते. परंतु, हे सगळे समोरचे आहे. त्यामुळे कोणाच्या दबावामुळे हे सर्व होते. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून ईडी असेल, सीबीआय आणि आयटी असेल या ज्या तपास यंत्रणा आहेत. या देशाची लोकशाही मजबूत करतात. खर तर त्यांचे ते काम असते. असे दिसतय की ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगल्याबाहेर जशे शेपट्या हलविणारे कुत्रे असतात. तशे ते वाटत आहेत. ही मी तुम्हाला चांगली बातमी दिली आहे. तुम्ही दाखवा ती. दबाव आहेच. हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला ही माहिती आहे.”
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटसंदर्भात भाई जगताप म्हणाले, “यापूर्वी ज्या ज्या वेळाला आलो त्या वेळेला तुम्ही कोणी मला विचारले नाही. आज विचारताय तशी कारणे आहे हे जाहीर की, निवडणुका आहेत. त्यातील मी एक उमेदवार आहे. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी लढते. आणि महाविकास आघाडीचे नेते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक राव चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सर्व प्रमुख नेते सगळे मिळून ही लढाई आम्ही लढत आहोत. माझे काम आहे की मी या सगळ्या लोकांना भेटने शरद पवारसाहेब हे मुंबईत नव्हते. 2 ते 3 दिवस दिल्लीत होते. मी आज सकाळी त्यांचा आशिर्वाद घेतला. आता परत मी त्यांच्याकडे बोलत आहे. त्यामुळे मला असे वाटते की, मी उमेदवार असल्याने गाठी भेटी घेणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे मी सर्वांना भेटत आहे. गाठीभेटी यापूर्वीही होत होत्या. फरक ऐवढाच की तेव्हा निवडणुका होत नव्हत्या. आता निवडणुका आहेत. म्हणून तुम्ही विचारत आहात हा ऐवढाच फरक आहे.”
राज्यसभेच्या जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा महाविकास आघाडीची ट्रायडेंटवर बैठक परंतु, विधान परिषदेत प्रत्येक पक्ष वेगवेगळे पक्ष वेगळ्या बैठका घेत आहेत?, या प्रश्नावर भाई जगताप म्हणाले “प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या आमदारांना एकत्रित ठेवणे गरजेचे आहे. तेव्हाही ठेवले होते. त्यात काही प्रॉब्लेम आहे. राहिली गोष्टी महाविकास आघाडीच्या तीन बैठका झाल्या. दोन बैठकांमध्ये मी स्वत: होतो. बाकी सर्व नेते होते. आताच अजित दादांनी सांगितले की, आज उद्या महाविकास आघाडीचे प्रमुख नेते बसणार आहेत. गरज नाही सगळ्या आमदार आणि मला किंवा इतर उमेदवारांना घेऊन बसण्याची गरज नाही. त्यामुळे महाविकास आघाडी जेव्हा ही निवडणूक लढते, त्याबाबतीत पूर्णतहा त्यांचे निर्णय आणि त्यांची पाऊले उचलणे. जे काही संदर्भ असतील ते सर्व संदर्भ एकत्र करून आमच्या आमदारांना मार्गदर्शन करणे हे काम आहे. आणि ते होईल.”
संबंधित बातम्या
“विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
“विधान परिषदेत मविआची विकेट पडेल; भाजपची नाही”, चंद्रकांत पाटलांचा दावा
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.