HW News Marathi
राजकारण

एक ‘पगडी’ राजकारण महाराष्ट्रासाठी घातक सामनातून पवारांवर टीका

मुंबई | सध्या महाराष्ट्रात पगडीचे राजकारण चांगलेच पेटताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन निमित्ताने पुण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या नेते मंडळींना पुणेरी पगडीने सर्वांना सन्मानित करण्यात आले होते. परंतु नुकतेच तुरुंगातून सुटका झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मात्र पुणेरी पगडी न घालता त्यांच्या डोक्यावर महात्मा फुले यांचे पागोटे घातल्यामुळे राजकारणाला सुरुवात झाली.

या मेळाव्यात भुजबळांना जे पागोटे घातले यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘पगडी नाट्य जणू ठरवून एका विष्ट समाजाला संदेश देण्यासाठीच घडवून आणले’, असल्याची टीका सामनातून केली आहे. पुढे सामनात असे देखील म्हटले की, ‘पुणेरी पगडी ही लोकमान्य टिळकांनी देशभर मिरवली. टिळक हे फक्त ब्राह्मण नव्हते तर भारतीय असंतोषाचे जनक होते.’ तसेच राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:च्या डोक्यावर पुणेरी पगडी घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तो जाणीवपुर्वक हाणून पाडला असे देखील सामनाच्या संपादकीयमधून पवारांवर टीका केली.

  • सामना संपादकीय

शरद पवारांचे भान सुटले आहे किंवा त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. भीमा–कोरेगाव दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीस नवा जातीय सूर सापडला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहायला हवे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर, कैराना येथील धार्मिक दंगलीनी मतांचे धार्मिक ध्रुवीकरण केले. महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरण करण्याचे अचाट प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांनी आता जे एक‘पगडी’ राजकारण सुरू केले आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे एवढे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काहींना हे आरक्षण फार काळ टिकू नये असे वाटते !

News Desk

…म्हणून ह्यांना एक प्रकारचा माज आलाय !

News Desk

अनिल देशमुख यांच्या जामिनाविरोधात ईडीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna
मुंबई

पनवेल महापालिकेच्या आशिर्वादाने रहिवाशी त्रस्त

News Desk

पनवेल | उन्हाळ्यात पनवेल महापालिकेकडून वेळेत नालेसफाई न झाल्यामुळे पावसाला सुरुवात होताच कामोठेकर त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पासून कामोठे सेक्टर १९ मधील नागरिक नाल्याच्या दुर्गंधीमुळे पुरते हैराण झाले आहेत. सेक्टर १९ मधील या नाल्यात पनवेलसह आजू बाजूच्या परिसराचे सांडपाणी सोडले जाते. या नाल्या लगतचं ऐक कचरा पेटी असून नागरिक त्यात ओला, सुका कचरा टाकतात.

या नाल्यातून कचरा सध्या ओव्हरफ्लो झाला असून तो रस्त्यावर पडलेला दिसून येत आहे. तरीही वेळोवेळी कचरा गाडी कचरा उचलायला येत नाही. तरी तिथे नाल्या बरोबरच कचऱ्याची सुद्धा दुर्गंधी नागरिकांना सहन करवी लागते . हा नाला उघडा असल्यासमुळे घाण वास, डास यांमुळे आरोग्यावर होणारा परिणाम होत आहे. आरोग्या संदर्भात अनेक समस्यांना तेथील रहिवाशांना सामोरे जावे लगते . रहिवाश्यांनी स्थानिक नगरसेवकाकडे तक्रार करून सुध्दा तेथील रहिवाशांना दुर्गंधी पासून आणि कचरा पासून अद्याप सुटका मिळालेली नाही. एवढ्या समस्या असून नगरसेवक आणि पनवेल महानगरपालिका लक्ष देत नसल्याची तक्रार स्थानिक नागरीक करत आहेत.

Related posts

आज मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

२ तास उलटून गेले तरी चर्चा सुरूच, बेस्टचा संप आज तरी मिटणार का ?

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशी संप सुरूच, वडाळा आगाराला घेराव

News Desk