HW News Marathi
राजकारण

#ElectionsResultsWithHW : देशातील प्रतिष्ठेच्या लढती

नवी दिल्ली | देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल आज (२३ मे ) जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, साध्वी प्रज्ञा सिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सप अध्यक्ष अखिलेश यादव, युपीए अध्यक्षा सोनिया गांधी अशा अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून देशभरात १७ व्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू होती.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी तर काँग्रेस अजय राय निवडणुकीच्या रिंगणारत आहे.

  • गुजरातच्या गांधीनगरमधून भाजपच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तर काँग्रेसकडून जवानजी चावडा

  • युपीए अध्यक्ष सोनिया गांधी उत्तर प्रदेशमधील पारंपरिक मतदारसंघ रायबरेली तर भाजप दिनेश प्रताप सिंग.

  • पूर्व दिल्लीतून भाजपकडून क्रिकेटर गौतम गंभीर तर काँग्रेसकडून अरविंदर लवली

  • भोपाळ मतदार संघातून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर तर काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग

  • लखनौमधून भाजपच्या वतीने राजनाथ सिंह तर समाजवादी पार्टीकडून पूनम सिन्हा

  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठी तर भाजपकडून स्मृती ईराणी

  • पटणा साहेब मतदार संघामधून काँग्रेस शत्रुघ्न सिन्हा तर भाजपचे रविशंकर प्रसाद

  • काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती अनंतनाग मतदारसंघ तर काँग्रेसकडून गुलाम अहमद मीर

  • गुना मतदार संघातून काँग्रेसचे मध्ये प्रदेश ज्योतिरादित्य सिंधिया तर भाजप के. पी. यादव

  • आजमगडमधून समाजवादी पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव तर भाजप दिनेश लाल यादव

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा आठवलेंना पाठिंबा

News Desk

काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला मतदान, सुशीलकुमार शिंदेंचाही आरोप

News Desk

उद्या आम्ही सत्तेत आल्यास पालेकरांना आमच्यावरही टीका करण्याचा अधिकार !

News Desk