HW News Marathi
राजकारण

‘युती झाली नाही तरीही लोकसभेला भाजपसोबत’

सांगली | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी मदत केल्यामुळेच खानापूर-आटपाडी मतदारसंघातील टेंभूचा प्रश्न मार्गी लागला. मतदारसंघातील बहुतांशी गावांचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप – सेनेची युती झाली तरी आणि नाही झाली तरी माझा पाठिंबा हा भाजप उमेदवारालाच राहील, अशी ग्वाही आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली. येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. माझी ही बांधिलकी खासदार संजय पाटील यांच्यासाठी नसून भाजपसाठी आहे. अशी भूमिका यावेळी आमदार अनिल बाबर यांनी मांडली.

आमदार बाबर म्हणाले, जिल्हा परिषद निवडणूक पाठिंब्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीकडून मला अध्यक्ष पदाची ‘ऑफर’ होती. परंतू मी भाजपला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. भाजपला पाठिंबा दिल्याने माझ्या मतदारसंघातील टेंभू योजनांच्या कामाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाची मदत केली. भाजपकडून कोणीही उमेदवार असला तरी त्याचा प्रचार करणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांत खासदार पाटील यांची भूमिका माझ्या विरोधातच होती. तरीही ते भाजपचे उमेदवार असतील तर माझा पाठिंबाच राहील. इतकेच नाही, तर विधानसभेसाठी त्यांनी कोणाला मदत करायची, हा त्यांचा प्रश्न आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पाकिस्तानने अणूबॉम्ब ईदसाठी ठेवलेला नाही, मेहबुबा मुफ्तींना पाकिस्तानचा पुळका

News Desk

पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय गुजरात दौरा

News Desk

मोदी सरकारने नोटबंदी करून मुंबईकरांवर आक्रमण केलं

swarit
देश / विदेश

विधानसभेच्या १९९ जागांसाठी राजस्थानमध्ये मतदान सुरु

News Desk

मुंबई | राजस्थानमध्ये १९९ विधानसभा सीटांसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. राज्यात ४ करोड ७४ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निडणुकीसाठी २२७४ उमेदवार निवडणुकीच्या रींगणात आहेत. अलवर जिल्ह्यातील रामगढमधील बसपाचे उमेदवार असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्या ठिकामी निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. यासाठी नवीन तारखांची घोषणा केली जाईल.

भाजपने २०० जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर कॉंग्रेसने १९५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. कॉंग्रेसने राष्ट्रीय लोकशाही पक्षाला ४ जागा दिल्या आहेत. बीएसपीने १९१ जागांसाठी उमेदवारी जाहीर केली असून आम आदमी पार्टीने १४३ जागांवर उमेदवार दिले आहेत. सीपीआय १६ , सीपीएम २८, भारत वाहिनी पार्टी ६३ आणि नॅशनल डेमोक्रेटिक पार्टीचे ५६ उमेदवार सध्या निवडणुकीच्या रींगणात आहेत.

 

 

Related posts

फोन टॅपिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने देवेंद्र फडणवीस घाबरलेत !

News Desk

उत्तर प्रदेशामधील शाळेत १ लिटर दूध ८१ मुलांमध्ये वाटप

News Desk

अशिक्षित लोक देशावरील ओझं! – अमित शाह

News Desk